Coriander cultivation : कमी दिवसांत जास्त नफा! कोथिंबिरीच्या लागवडीतून 45 दिवसांत मिळतील लाखो रुपये, ही आहेत प्रगत वाण

Ahmednagarlive24 office
Published:

Coriander cultivation : शेतकऱ्यांना कमी दिवसांत आणि कमी खर्चात कोथिंबीरीचे पीक लखपती बनवू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांना सुधारित वाणाची लागवड करावी लागेल. कमी दिवसांत जास्त नफा देणारे कोथिंबीर हे एक पीक आहे.

लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. या दिवसांमध्ये कोथिंबिरीची बाजारात मागणी अधिक प्रमाणात वाढत असते. त्यामुळे आता कोथिंबीर लागवड करण्यासाठी योग्य वेळ आहे. प्रत्येक स्वयंपाक घरात कोथिंबीर वापरली जाते.

शेतकरी कच्ची किंवा वाळवून देखील कोथिंबीर बाजारात विकू शकतात. बाजारात धन्याला खूप मागणी आहे. भारत हा मसाल्याचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र मसाला बनवण्यासाठी धने मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

कोथिंबिरीला देशभरात मागणी आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये त्याची अधिक लागवड केली जाते.

कोथिंबीरच्या सुधारित जाती

कोथिंबीर लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सुधारित वाणांची पडताळणी करणे गरजचे आहे. हिस्सार सुगंधा, आरसीआर ४१, कुंभराज, आरसीआर ४३५, आरसीआर ४३६, आरसीआर ४४६, जीसी २ (गुजरात कोथिंबीर २), आरसीआर ६८४, पंत हरितमा, सिम्पो एस. ३३, जेडी-१, एसी ६, सीएस आर१ या कोथिंबिरीच्या सुधारित जाती आहे.

अशी करा कोथिंबिरीची पेरणी

उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबिरीची लागवड करणे महागात पडू शकते. कारण या दिवसांत कोथिंबीर उगवण्यास अडचण येते त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाया जाण्याची शक्यता असते.

कमी उष्णतेमध्ये कोथिंबीरीचे पीक जोमदार येते. एकरी पेरणीसाठी 15 ते 20 किलो कोथिंबीर बियाणे पुरेसे आहे. पेरणीपूर्वी कोथिंबीरचे दोन भाग करावेत. हे करत असताना लक्षात ठेवा की कोथिंबिरीचा अंकुरलेला भाग नष्ट होऊ नये. त्यांच्यासाठी धणे 12 ते 24 तास पाण्यात भिजत ठेवावे आणि हलके सुकल्यानंतर त्यावर बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.

कोथिंबिर पिकातून होईल लाखांची कमाई

जर तुम्ही आता कोथिंबिरीची लागवड केली तर तुम्हाला चांगला दर मिळू शकतो. ४० ते ४५ दिवसांत कोथिंबीर बाजारात नेण्यासाठी तयार होते. जर बाजार चांगला असेल तर एका एकर कोथिंबिरीतून तुम्ही लखपती बनू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe