Bank Debit Card Charges : महागाईचा पुन्हा भडका! ‘या’ बँकेने वाढवले डेबिट कार्ड सर्विस चार्ज, जाणून घ्या नवीन दर

Published on -

Bank Debit Card Charges : जर तुम्ही कॅनरा बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता कॅनरा बँकेच्या ग्राहकांना डेबिट कार्ड सर्विस चार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. कालपासून हे नवीन दर या बँकेने लागू केले आहेत.

या बँकेने विविध कार्ड प्रकारांवरील डेबिट कार्ड सेवा शुल्कात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अगोदरच महागाईमुळे हैराण असलेल्या ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. जाणून घेऊयात हा चार्ज किती रुपयांपर्यंत वाढला?

याबाबत कॅनरा बँकेने एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, ‘वर नमूद केलेले सेवा शुल्क करांव्यतिरिक्त आहे. लागू कर अतिरिक्त गोळा केला जाणार आहे. सुधारित सेवा शुल्क 13.02.2023 पासून लागू होणार आहेत.’

जाणून घ्या वार्षिक डेबिट कार्ड शुल्क

क्लासिक किंवा स्टँडर्ड डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 125 रुपयांवरून 200 रुपयांपर्यंत वाढवले आहे; प्लॅटिनम आणि बिझनेस कार्डसाठी, ते अनुक्रमे 250 रुपये ते 500 रुपये आणि 300 रुपये ते 500 रुपयांपर्यंत वाढवले आहे. इतकेच नाही तर आता कॅनरा बँक निवडक डेबिट कार्ड्ससाठी वार्षिक 1000 रुपये शुल्क आकारत राहणार आहे.

नवीन डेबिट कार्ड बदलण्याचे शुल्क

क्लासिक किंवा स्टँडर्ड डेबिट कार्डसाठी, कॅनरा बँकेने डेबिट कार्ड बदलण्याचे शुल्क शून्य ते 150 रुपये इतके केले आहे. या बँकेने प्लॅटिनम, बिझनेस आणि निवडक कार्ड्ससाठी शुल्क 50 रुपयांवरून 150 रुपये केले आहे.

असा आहे कार्ड निष्क्रियीकरण शुल्क

बिझनेस डेबिट कार्डच्या ग्राहकांसाठी, बँक आता प्रत्येक वर्षाला केवळ 300 रुपये कार्ड निष्क्रियीकरण शुल्क घेणार आहे. इतर कार्ड प्रकारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

एसएमएस अलर्टसाठी मोजावे लागणार इतके शुल्क

ही बँक आता वास्तविक आधारावर एसएमएस अलर्ट शुल्क आकारणार आहे. जे पूर्वी प्रति तिमाही 15 रूपे होते. कॅनरा बँक डेबिट कार्ड – स्टँडर्ड/क्लासिकसाठी, एटीएममधून दिवसाला रोख पैसे काढण्याची मर्यादा रुपये 40,000 आहे, तर व्यवहारांसाठी दररोज रोख पैसे काढण्याची मर्यादा रुपये 1 लाख आहे. तर कॅनरा बँक डेबिट कार्डसाठी – प्लॅटिनम/सिलेक्ट दैनंदिन रोख पैसे काढण्याची मर्यादा रुपये 50,000 इतकी असून दैनंदिन खरेदी व्यवहार मर्यादा 2 लाख रुपये इतके आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!