Mahashivratri 2023 : देशात महाशिवरात्री धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी अनेक ठिकाणी जय्यत तयारी सुरु आहे. १८ फेब्रुवारी 2023 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेकजण महादेवाच्या मंदिरात जाऊन विशेष पूजा करत असतात.
महाशिवरात्रीदिवशी शनि प्रदोष देखील आहे आणि त्याच वेळी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. अशा वेळी जर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा केली तर तुमच्यावरील कर्ज झटक्यात दूर होईल आणि तुमच्याकडे भरपूर पैसा येईल.
कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीला हे उपाय करू शकता
जर तुमच्यावर अगोदरपासूनच कर्ज आहे आणि त्यातून तुम्हाला मुक्त होईचे आहे तर तुम्हाला महाशिवरात्रीदिवशी काही उपाय करावे लागतील. शिवमहापुराणात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय करताच तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल आणि आणि परिस्थिती सुधारू लागेल.
महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगात शिवलिंगावर मसूर अर्पण करताना ‘ओम ऋं मुक्तेश्वर महादेवाय नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यामुळे तुमच्यावर असलेले सर्वात मोठे कर्ज देखील संपू शकते.
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर तूप आणि तीळ अर्पण करावे. हे करत असताना ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा जप करताना शिवलिंगावर 1100 वेळा तूप मिसळून तीळ अर्पण करा. यामुळे तुमची परिस्थिती आणखी सुधारेल.
करिअरमध्ये वाढ होत नसेल तर महाशिवरात्रीला शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. यामुळे तुम्हाला करिअर मध्ये चांगली संधी मिळू शकते. त्याचबरोबर पैशाची चणचणही कायमची दूर होईल.