PM Modi Scheme : मोदी सरकार तरुणांना देणार दरमहा 6000 हजार रुपये? जाणून घ्या यामागचे सत्य

Published on -

PM Modi Scheme : सध्या केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना चालवत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या अनेक योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना होताना आपल्याला दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एका मेसेजने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

या मेसेजमध्ये बेरोजगार तरुणांना सरकार 6000 रुपये दर महिन्याला देणार आहे असा दावा केला आहे. व्हायरल होणारा हा मेसेज खरा आहे की खोटा ते पीआयबीने तपासले आहे. त्यामुळे आता या व्हायरल होणाऱ्या मेसेजमागचे सत्य काय आहे? ते जाणून घ्या.

पीआयबीने यामागील तथ्य तपासले

सोशल मीडियावर बरेच मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सरकार आता बेरोजगारांना आर्थिक मदत करत आहे, असा दावा या संदेशात केला जात आहे. हे पोस्ट पाहिल्यानंतर, पीआयबीने त्याची सत्यता पडताळून पाहिली आहे.

केले असे ट्विट

एक व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्यला 6,000 रुपये भत्ता देत आहे.

  • व्हायरल होत असलेला हा संदेश खोटा आहे.
  • कारण भारत सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही.
  • त्यामुळे चुकूनही कृपया मेसेज फॉरवर्ड करू नका.

चुकूनही असा मेसेज शेअर करू नका

केंद्र सरकारने पुढे असेही म्हटले आहे की, असे चुकीचे संदेश कधीही शेअर करू नयेत. जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा लागणार आहे.

तपासून पहा फॅक्ट

अशा बनावट बातम्यापासून दूर राहा तसेच या बातम्या शेअर करू नका, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. जर तुम्हाला कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही या मोबाईल क्रमांक ९१८७९९७११२५९ किंवा [email protected] वर मेल करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News