Amol Kolhe : अमोल कोल्हे यांचा संसदेत डंका! संसदरत्न पुरस्कारासाठी झाली निवड

Published on -

Amol Kolhe : सध्या केंद्रातील संसदरत्न पुरस्कार 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी बाजी मारली आहे. संसदेतील त्यांच्या भाषणाची सातत्याने चर्चा होत असते. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे.

तसेच महाराष्ट्रातील भाजपचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे, भाजपच्या हिना गावित, राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना संसदरत्न पुरस्कार झाला आहे. या खासदारांनी संसदेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

तसेच राज्यसभा खासदारांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. जॉन ब्रिट्स, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, समाजवादी पक्षाचे विशंभर प्रसाद निषाद आणि काँग्रेसच्या छाया वर्मा यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

दरम्यान जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील लोकसभेच्या आणि विजय साई रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभेच्या स्थायी समितीलाही संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अर्थविषयक संसदीय समिती आणि पर्यटन, वाहतूक आणि संस्कृतीविषयक स्थायी समितीचा समावेश आहे.

दरम्यान, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी संसदरत्न पुरस्कार सुरू केले होते. डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. ही परंपरा अजून सुरू आहे. दरवर्षी या पुरस्काराची घोषणा केली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe