Uddhav Thackeray : सर्व शिवसैनिकांना सांगा ही सभा विराट झाली पाहिजे. त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आता आपला दौरा सुरू केला आहे. 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची कोकणात जाहीर सभा होणार आहे. यामुळे या सभेत ते काय बोलणार याकडे राज्याचे तसेच दिल्लीचे लक्ष लागले आहे.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा होणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेर दौरा करत आहे
या सभेवेळी ठाकरे गटात इतर राजकीय पक्षांचे नेतेही प्रवेश करणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा महत्वाचा मानला जात आहे. खेड येथे उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी मातोश्रीच्या बाहेर संवाद साधला आहे.
दरम्यान, शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरा करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हाप्रमुख यांच्यासह महानगरप्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणा दिल्या.
राज्यभर दौरा करण्याचा निर्णय घेत असताना सुरुवात कोकणातून करण्यात आली आहे. त्याची तयारी शिवसैनिकांनी सुरू केली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.