Kasba by-election : पुण्यातील कसबा पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. याठिकाणी अनेक वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. असे असताना आता महाविकास आघाडीने जोरदार टक्कर दिली आहे. यामुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 2 तारखेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
असे असताना महाविकास आघाडीच्या उत्साही कार्यकर्त्यानी रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर पुण्यात ठिकठिकाणी लावलेले पाहिला मिळत आहे. आधी वडगावमध्ये नंतर आता सारसबागेतही रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा असे बॅनर लागले आहेत.

यामुळे आता कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्साही कार्यकर्त्यानी या पूर्वीच विजयाचा जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अमोल ननावरे यांनी हा बॅनर लावला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीने आतापर्यंत अनेक राजकीय वळण घेतले आहेत. निवडणुकांचा तारखा जाहीर झाल्यापासून ते उमेदवारी मिळण्यापर्यंत व मतदान प्रक्रियेमध्ये झालेला गोंधळ यामुळे आता कोणता उमेदवार विजयी होणार या विषय उत्सुकता वाढू लागली आहे.
२६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. मात्र या मतदानावेळी मोठा गोंधळ देखील झाला होता. अनेकांनी पैसे वाटले, मतदार यादीत नाव नसणे, असे अनेक प्रकार घडले. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.