IMD Rain Alert : देशात हळूहळू उष्णता वाढू लागली आहे. उन्हळ्याची चाहूल लागताच भारतीय हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात तापमानात वाढ तसेच घट देखील होत आहे. तापमान अस्थिर झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही भागात अजूनही थंडी आहे तर काही भागातील थंडी हळूहळू कमी होत आहे. तर काही भागात हवामान कोरडे आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. येत्या काही दिवसांत तापमानात फारसा काही बदल होणार नाही असे हवामान खात्याने सांगितले आहे.
हवामान खात्याकडून या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्यावर, उत्तरकाशी, चमोली आणि पिथौरागढमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी गढवाल विभागातील डोंगराळ जिल्हे, पिथौरागढ आणि कुमाऊँच्या बागेश्वरमध्ये हलका पाऊस किंवा हिमवर्षाव होऊ शकतो.
यासह, एक किंवा दोन मार्च रोजी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी दिसून येईल. याशिवाय, पुढील २४ तासांत पंजाब, उत्तर हरियाणा आणि दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
राजधानी दिल्लीतील हवामानाची स्थिती
एकीकडे भारतीय हवामान खात्याकडून काही भागात पावसाचा इशारा देण्यात येत असला तरी दिल्लीमध्ये तापमानात हळूहळू वाढ होत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. रविवारी दिल्लीमध्ये कडक उन्हामुळे तापमान 32.2 अंशांवर पोहोचले होते.
IMD च्या म्हणण्यानुसार डोंगराळ भागात विशेषतः उत्तराखंडच्या निर्जन भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. तसेच उत्तराखंडच्या काही भागात गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
डोंगराळ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मैदानी भागात गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात उत्तर भारतातील अनेक भागात हलका पाऊस पडू शकतो.