Pan Card : सावधान ! .. तर रद्द होणार तुमचा पॅनकार्ड ; ‘त्या’ प्रकरणात सरकारने दिला इशारा

Ahilyanagarlive24 office
Published:

Pan Card : पुन्हा एकदा इशारा देत सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही जर 31 मार्चपूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड ब्लॉक होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणी येऊ शकतात .

प्राप्तिकर विभागाच्या एका एडवाइजरी असे म्हटले आहे की “आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारकांसाठी जे सूट श्रेणीमध्ये येत नाहीत त्यांनी 31.03.2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. 1.04 2023 पासून अनलिंक केलेले पॅन निष्क्रिय होईल.”

पॅन निष्क्रिय झाल्यास काय होऊ शकते 

आयटी रिटर्न भरण्यासाठी व्यक्ती निष्क्रिय पॅन वापरण्यास असमर्थ असेल

प्रलंबित असलेल्या रिटर्नवर प्रक्रिया केली जाणार नाही

निष्क्रिय पॅनला कोणताही प्रलंबित परतावा मिळणार नाही

एकदा PAN कार्य करणे थांबवल्यानंतर, चुकीच्या रिटर्न्सच्या संदर्भात प्रलंबित कार्यवाही पूर्ण करणे अशक्य होईल आणि कर कपातीचा उच्च दर लागू केला जाईल.

पोर्टलद्वारे तुमचा पॅन-आधार लिंक करण्यासाठी स्टेप 

स्टेप 1: प्राप्तिकर e-filing- eportal.incometax.gov.in किंवा incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

स्टेप 2: तुम्ही पोर्टलवर आधीच नोंदणी केली नसेल तर स्वतःची नोंदणी करा. येथे तुमचा यूजर आयडी पॅन क्रमांक असेल.

स्टेप 3: तुमचा यूजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून पोर्टलवर लॉग इन करा.

स्टेप 4: एक पॉप-अप विंडो दिसेल, जी तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक करण्यास सांगेल.

स्टेप 5: विंडो दिसत नसल्यास, मेनूबारवरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जा आणि आधार लिंकवर क्लिक करा.

स्टेप 6: तुमच्या पॅन कार्डच्या तपशीलानुसार नाव, जन्मतारीख आणि लिंग यासारखी माहिती आधीच नमूद केली जाईल.

स्टेप 7: आधारवर नमूद केलेल्या तपशीलांसह स्क्रीनवर पॅन तपशील व्हेरिफाय करा.

स्टेप 8: काही विसंगत असल्यास, तुम्हाला कोणत्याही दस्तऐवजात ते दुरुस्त करणे आवश्यक आहे.

स्टेप 9: तपशील जुळत असल्यास, तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि आता लिंक करा बटणावर क्लिक करा.

स्टेप 10: एक पॉप-अप मेसेज तुम्हाला कळवेल की तुमचा आधार तुमच्या पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाला आहे.

हे पण वाचा :- Smartphone Offers : ग्राहकांची मजा ! 10 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणा ‘ह्या’ दमदार स्मार्टफोन ; पहा संपूर्ण लिस्ट

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe