Bacchu Kadu : आजोबांनी बच्चू कडूंची जिरवली! तुम्ही शेतकऱ्यांशी गद्दारी का केली म्हणत गाडीच आडवली…

Published on -

Bacchu Kadu : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांना गद्दार म्हटले जात आहे. अनेक ठिकाणी मतदार संघात देखील लोकांना ते पटले नाही. यामुळे गद्दार हा शब्दच आता सर्वांना परिचित झाला आहे. आमदार बच्चू कडू हे देखील शिंदे यांच्यासोबतच बाहेर पडले होते.

आमदार बच्चू कडू यांना तर वैयक्तीक टीकेलाही समोरे जावे लागले आहे. त्यांना काही नागरिकांनी थेट सुनावले आहे. त्यांच्यासमोरच टीकात्मक घोषणाही केल्या आहेत. यामुळे याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

एका 80 वर्षाच्या शेतकरी अर्जुन भगवान घोगरे यांनी बच्चू कडूंची गाडी अडवून तुम्ही शेतकऱ्यांशी गद्दारी का केली, असा प्रश्न उपस्थित केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.

यामुळे बच्चू कडू यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. आजोबांनी कडू यांनी अपेक्षाभंग केल्याची खंतही व्यक्त केली. घोगरे या ज्येष्ठ शेतकऱ्याने त्यांचा ताफा अडविला. यावेळी बच्चू कडू हे गाडीतून बाहेर आले.

त्यांनी शेतकऱ्याशी संवांद साधण्याचा प्रयत्न केला. घोगरे यांनी ऐकून न घेता ते म्हणाले, तुम्ही डाकूसोबत का गेलात? शेतकऱ्यांशी गद्दारी का केली? तुम्हाला ज्या आशेने निवडून दिले त्यावर पाणी फिरविले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe