Steel and Cement Price : होळीच्या मुहूर्तावर घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून स्टील आणि सिमेंटचे दर घसरत आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये घर बांधणे शक्य झाले आहे.
तुम्हीही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्याचा विचार करत असाल तर हीच सुवर्णसंधी आहे. आता स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाल्याने पैशांची मोठी बचत होईल. घर बांधण्यासाठी स्टील आणि सिमेंट हे महत्वाचे घटक आहेत.
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. स्टील आणि सिमेंटच्या किमती गेल्या काही दिवसांपूर्वी गगनाला भिडल्या होत्या. मात्र सध्या स्टील आणि सिमेंट स्वस्त मिळत आहे.
स्टील आणि सिमेंटच्या किमतीत चढ-उतार
स्टील आणि सिमेंटच्या किमतीमध्ये सतत चढ उतार कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्टील आणि सिमेंटचे दर खूपच वाढले होते. त्यामुळे घर बांधणाऱ्यांचे बजेट कोलमडले होते. मात्र सध्या स्टील आणि सिमेंटच्या किमतीमध्ये कमालीची घट झाली आहे.
स्टील आणि सिमेंटच्या मागणीत वाढ झाली की त्यांचे दर देखील वाढत असतात. पण सध्या बांधकाम क्षेत्रातील कामाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे स्टील आणि सिमेंटच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे दरही कमी झाले आहे.
पण लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत बांधकाम क्षेत्रातील अनके कामे प्रचंड वेगाने चालू असतात. त्यामुळे स्टील आणि सिमेंटच्या मागणीत देखील वाढ होते आणि दरही वाढतात.
गेल्या वर्षी स्टीलचे दर ७० हजार रुपये प्रति टन च्या पुढे गेले होते. तसेच सिमेंटही प्रति बॅग ४०० रुपये झाले होते. तसेच वाळू आणि विटा देखील महाग झाले होते. मात्र आता स्टील आणि सिमेंटचे दर खूप कमी झाले आहेत.
स्टीलचे नवीन दर
गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या स्टीलच्या दरात जवळपास १५ हजार रुपये प्रति टन घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्टील खरेदीमध्ये पैशांची बचत होऊ शकते. स्टीलचे नवीन दर तुम्ही खाली पाहू शकता.
मुंबई महाराष्ट्र TMT 12mm 56000 रुपये प्रति टन 4-मार्च-23
नागपूर महाराष्ट्र TMT 12mm 51500 रुपये प्रति टन 4-मार्च-23
जालना महाराष्ट्र TMT 12 mm 55500 रुपये प्रति टन 4-मार्च-23
सिमेंटच्या किमती
एसीसी सिमेंट- 375 रुपये प्रति बॅग
अल्ट्राटेक सिमेंट- 330 रुपये प्रति बॅग
बिर्ला सिमेंट- 375 रुपये प्रति बॅग
जेपी सिमेंट- 390 रुपये प्रति बॅग
दालमिया सिमेंट- 410 रुपये प्रति बॅग
जे के सिमेंट- 390 रुपये प्रति बॅग
प्रिया सिमेंट- 330 रुपये प्रति बॅग
श्री सिमेंट- 350 रुपये प्रति बॅग