प्रेरणादायी ! पतीनिधनाच्या शोकातून सावरत कल्पनाताईंनी साकारलं शेतीमध्ये अकल्पनीय यश; वेगवेगळ्या प्रयोगातून कमवलेत लाखों, वाचा ही जिद्दीची कहाणी

Published on -

Success Story : शेतीमध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यासोबतच अनेक पारिवारिक संकटे देखील शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभे असतात. या संकटातून मात्र बळीराजा नेहमीच खंबीरपणे नवीन मार्ग शोधत लढत राहतो. अशीच एक प्रेरणादायी कहानी समोर येत आहे ती नंदुरबार जिल्ह्यातून. खरं पाहता, शेती व्यवसायात अलीकडे स्त्रियांनी मोठी अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली आहे.

ही कहानी देखील महिलांचे अकल्पनीय साहसचे बखान करणारीच आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मौजे वडाळी येथील कल्पना मोहिते नामक महिला शेतकऱ्याला 2006 मध्ये पती पतीनिधनाचा शोक झाला. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने संसाराची सर्व जबाबदारी कल्पनाताई वर येऊन पडली. एकीकडे पती निधनाचा शोक तर दुसरीकडे संसाराचा गाडा चालवण्याची आणि मुलांची जबाबदारी.

मुलांच्या शिक्षणाचा भविष्याचा विचार करत कल्पनाताईंनी पती निधनाच्या शोकातून बाहेर पडत, न खचता शेती व्यवसायाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. शेतीची जबाबदारी घेतल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी शाश्वतं पाण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तब्बल दहा किलोमीटर अंतरावरून तापी नदी मधून जलवाहिनीद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण शेती बागायती केली शिवाय भाडेतत्त्वावर 15 एकर शेत जमीन कसण्यासाठी देखील घेतली.

शेतीमधील मशागतीचे कामे पुरुषाप्रमाणे कल्पनाताईंनी केली. नांगरणी, वखरणी, फवारणीचे सर्व कामे करून त्यांनी आपल्या विस्कटलेल्या संसाराची घडी पूर्ववत केली. मुलांना उच्च शिक्षण दिले. कल्पनाताईंना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. त्यांच्या मुलाने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ मुंबईमध्ये नोकरी देखील केली. मात्र नंतर आईला मदत म्हणून त्यांनी नोकरीवर त्याग पत्र ठेवत शेती व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे.

मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता त्यांनी मुलींना देखील उच्च शिक्षण दिल आहे. खरं पाहता कल्पनाताई यांच्याकडे मात्र तीन एकर शेत जमीन होती. परंतु 2006 मध्ये पतीच्या निधनानंतर त्यांनी 15 एकर शेत जमीन भाडेतत्त्वावर घेत त्यामध्ये वेगवेगळ्या भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. यातून त्यांना चांगला नफा मिळत असून पाण्याची शाश्वत उपलब्धता असल्याने त्यांनी केळी पपई यांसारख्या इतर बागायती पिकांची देखील शेती सुरू केली आहे.

आजच्या घडीला कल्पनाताई शेती व्यवसायातून आपल्या संसाराचा गाडा हाकत असून मुलांना आपल्या या आईचा सार्थ अभिमान आहे. निश्चितच, पती निधनाने खचून न जाता संसाराचा गाडा यशस्वीरित्या पेलणाऱ्या कल्पनाताईंनी इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे. यामुळे इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील शेती व्यवसायात चांगली कामगिरी करण्याची उमेद लाभणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News