Pune BJP : कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी, आता शहरात राजकीय घडामोडींना वेग

Published on -

Pune BJP :  नुकत्याच पार पडलेल्या कसबा पोट निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. यामुळे सध्या पुण्यात भाजपात बदलाचे वारे वाहू लागले आहे. मध्यंतरी पुण्यात शहराध्यक्ष बदला अशी मागणीच भाजपच्या माजी नगरसेवकांने केली होती. मात्र नंतर तसे काही झाले नाही.

असे असताना आता मात्र कसब्यातील पराभवानंतर भाजपकडून नेतृत्वात बदल केला जाण्याची शक्यता आहे. महिनाअखेरीस पुण्यातील भाजपा कार्यकारिणीत बदल होण्याचे संकेत आहेत. यामुळे आता काय काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या पुणे शहर भाजपच्या कार्यकारिणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

तसेच येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात देखील पुण्याला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. या महिनाअखेरपर्यंत बदलांची शक्यता आहे. पुण्याला नवीन शहराध्यक्ष मिळणार? की भाजप पुन्हा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनाच संधी देणार हे पाहणं महत्वाचे असेल. यासाठी अनेकजण इच्छुक देखील आहेत.

पुणे शहर, जिल्हा कार्यकारिणीची दर तीन वर्षांनी नियुक्ती होते. मुदत संपली असल्याने या महिना अखेरीस बदल होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, गणेश बीडकर, धीरज घाटे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत.

यामुळे आता कोणाची कोणत्या पदावर वर्णी लागणार हे लवकरच समजेल. असेच आपल्या मर्जीतील नेता याठिकाणी बसवण्यासाठी देखील नेत्यांची पळापळ सुरू आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व कुणाला संधी देणार? हे पाहणं महत्वाचं असेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe