Rahul Gandhi : भाजप आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांचा यूके दौरा नुकताच झाला. ते केंब्रिज विद्यापीठातील त्यांनी अल्मा माटरमध्ये व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी भारतात लोकशाही धोक्यात आहे. संसदेत बोलू दिले जात नाही, असे म्हटले आहे.
तसेच त्यांचे माईक बंद केले जातात. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. आपल्या देशाची बदनामी बाहेरच्या देशांमध्ये जाऊन करतात, असे म्हटले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.

राहुल गांधी आणि पाकिस्तान आपल्या देशाचा सारखाच द्वेष करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा, अशी मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.
जेवढा द्वेष पाकिस्तान करतो, तेवढाच राहुल गांधी करत आहेत. पाकिस्तान आणि राहुल गांधींची भाषा एकच असून, त्यांना देशाबाबत बोलण्याचा अधिकार नाही, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
तसेच राहुल गांधी ज्या घरात राहतात सुविधा वापरतात ते भारत सरकारच्या आहेत. त्याच भारताची तुम्ही बदनामी करत असाल, तर दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन आणि राहुल गांधींमध्ये काही फरक नाही, असेही ते म्हणाले.