Mahavikas Aghadi : सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे. याबाबत त्यांनी जागा वाटप देखील केले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यामध्ये कोणाला किती जागा मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
काल महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. राज्यात लोकसभेसाठी ४८ जागा आहेत. मविआने या जागा एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठाकरे गट २१, राष्ट्रवादी काँग्रेस १९, काँग्रेस ८ जागा असा हा फॉर्म्युला ठरला आहे. यामुळे हाच फॉर्म्युला शेवटपर्यंत राहणार का हे लवकरच समजेल.

मुंबईत ६ पैकी ४ जागा ठाकरे गट लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात आघाडी सरकारने सरकार स्थापन केले होते, येत्या लोकसभा आणि स्थानिक निवडणुकीतही आघाडी एकत्र निवडणुका लढवेल, असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. राज्यात सभा घेण्यावर देखील यावेळी चर्चा झाली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, कॉंग्रेससोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडल तर ममता बॅनर्जीचा पाठिंबा घेतला तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडले होतं का?, काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत जाऊन तुम्ही काय केले, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. यामुळे आगामी काळात किती यश मिळणार हे लवकरच समजेल.