पुणे-मुंबई प्रवास होणार गतिमान ! देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ‘या’ दिवशी होणार खुला, प्रवाशांचा 90 मिनिटांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Mumbai News : सध्या महाराष्ट्रात दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. कोणत्याही राष्ट्राच्या, राज्याच्या विकासात तेथील रस्ते मार्ग मोलाची भूमिका निभावत असतात. याच पार्श्वभूमीवर राज्यात सध्या शासन, प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्ते विकासाची प्रकल्पे पूर्ण केली जात आहेत.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देखील असाच एक बहुउद्देशीय प्रकल्प असून या प्रकल्पाबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच एमटीएचएल अंतर्गत देशातील सर्वात मोठा सागरी पूल तयार केला जात आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास 90% पूर्ण झाले आहे. म्हणजेच आगामी काही महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार आहे.

दरम्यान आता या प्रकल्पाला मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला जोडण्यासाठी एक कॉरिडोर विकसित केला जाणार आहे. हा एलिव्हेटेड कॉरिडॉर एम एम आर डी ए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात असून जवळपास 1,351 कोटी रुपयांचा खर्च करून हा कॉरिडॉर विकसित होणार आहे.

हे पण वाचा :- State Employee Strike : ब्रेकिंग ! कर्मचाऱ्यांचा संप फुटला; आता ‘या’ मोठ्या संघटनेने संपातून घेतली माघार

एकंदरीत एमटीएचएल आणि या एलिवेटेड कॉरिडॉरमुळे मुंबई पुणे महामार्गाला थेट कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. परिणामी मुंबईहून लोणावळा आणि खंडाळा ही राज्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे लवकर गाठता येणार आहे. यामुळे मुंबई आणि लोणावळा खंडाळा तसेच पुणे दरम्यान चा प्रवास जवळपास 90 मिनिटांनी कमी होणार आहे.

याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. या प्रकल्पांतर्गत नरिमन पॉइंट येथून थेट मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अवघ्या तासाभरात पोहचणे शक्य व्हावे यासाठी चिर्ले येथून- मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गादरम्यान जवळपास साडे सात किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. म्हणजेच मुंबई आणि नवी मुंबई यामधील अंतर एमटीएचएल या सागरीसेतूमुळे प्रकल्पमुळे कमी होणार आहे.

या सागरी पुलामुळे मुंबई ते चिरलेदरम्यान अंतर कमी होईल तसेच आता या नवीन चिर्ले ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गदरम्यान साडेसात किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉर किंवा उन्नत मार्ग विकसित होणार आहे. हा प्रकल्प मुंबई ट्रान्स हार्बर लिंक एक्सटेंडेड प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! सरकारी नोकरीच्या खाजगीकरणाचा ‘तो’ निर्णय महाविकास आघाडी सरकारचाच; विधानसभेत समोर आली मोठी…

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाविषयी थोडक्यात

हा प्रकल्प 22 किलोमीटर लांबीचा आहे. या अंतर्गत सागरी पुल विकसित होत आहे. यापैकी 16.5 किलोमीटर लांबीचा मार्ग हा समुद्रातून असेल तर उर्वरित मार्ग हा जमिनीवर राहणार आहे. यासाठी जवळपास 17 हजार 850 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे सध्या 90 टक्के काम झाले असून उर्वरित काम देखील या वर्षी अखेर पूर्ण होणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये, हा प्रकल्प डिसेंबर अखेर पूर्ण होणार असल्याचे सांगितले गेले आहे.

म्हणजेच पुढल्या वर्षी हा प्रकल्प वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. शिवाय आता या प्रकल्पाला एक्सटेंड केलं जात असून हा प्रकल्प थेट मुंबई पुणे महामार्गाशी कनेक्ट करण्यासाठी उन्नत कॉरिडॉर विकसित होत आहे. यामुळे भविष्यात मुंबईहून पुण्यादरम्यानचा प्रवास गतिमान होण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर : जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी सुरू झाले शासकीय हरभरा खरेदी केंद्र, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe