Solar Cooler : लाईट नसली तरीही चालतो ‘हा’ हटके कुलर! बाजारात आहे मोठी मागणी, किंमत आहे फक्त इतकीच..

Updated on -

Solar Cooler : सध्या उन्हाची चांगलेच चटके बसू लागलेले आहेत. त्यामुळे उन्हाळा येताच बाजारात एअर कूलरची मागणी खूप वाढली आहे. या महिन्यापासून उन्हाची तीव्रता आणखी वाढली आहे. अशातच जर तुम्हाला उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका हवी असल्यास तुम्ही आताच स्वस्तात कूलर खरेदी करू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कूलरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची किंमत पंख्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे लोक या कूलरला खरेदी करीत आहेत. या कुलरची किंमत किती आहे? तो तुम्हाला कोठून विकत येईल? आणि याची वैशिष्ट्ये जाणून घ्या.

बाजारात सोलर कूलरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असून लोकांची खरेदीची लगबग सुरू आहे. या कूलरमध्ये तुम्हाला अनेक शानदार फीचर्स उपलब्ध आहेत.

मार्केटमध्ये तुम्हाला हे सोलर कूलर प्लास्टिक किंवा मेटल बॉडी दोन्हीमध्ये मिळत आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत करण्याबरोबरच प्रत्येक महिन्याला येणाऱ्या वीज बिलाचा खर्च टाळण्यासाठी अनेकजण सोलर कुलर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

या सोलर कूलरमध्ये विशेष प्रकारची बॅटरी देण्यात येते, जी सूर्यप्रकाशाने चार्ज केली जाते. सूर्यप्रकाशाने चार्ज झाल्यानंतर या बॅटरीच्या मदतीने हा कुलर चालतो.

तर दुसरीकडे, जर आपण त्यांच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला ते 3 हजार रुपयांपासून 22 हजार रुपयांपर्यंत सहज मिळतील. उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही सोलर कूलर खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe