2023 Hyundai Verna : Hyundai कंपनीच्या अनेक कार बाजारात धुमाकूळ घालत आहेत. तसेच ग्राहकांकडूनही या कंपनीच्या कार्सला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीकडून २०२३ मधील नवीन Hyundai Verna लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीकडून भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.
Hyundai कडून ग्राहकांच्या आवडीची कार पुन्हा एकदा नवीन रूपात भारतीय ऑटो बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये आकर्षक डिझाईन देण्यात आले आहे. तसेच सुरक्षेच्या बाबतीतही कंपनीकडून अधिक फीचर्स देण्यात आले आहेत.

कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेली नवीन Verna कार 19Kmph मायलेज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन कारला ग्राहक कसा प्रतिसाद देतात याकडे पाहणे महत्वाचे आहे.
किंमत
Hyundai कंपनीकडून Verna ही कार नवीन डिझाईन आणि वैशिष्ट्यांसह बाजारात सादर करण्यात आली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 10.89 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही डीलरशिपवर 25,000 रुपयांची टोकन रक्कम भरून बुक करू शकता.
2023 Hyundai Verna EX, S, SX आणि SX (O) या 4 पर्यायांमध्ये बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. ही कार एकूण 9 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. कारची लांबी आधीच वाढली आहे. नवीन कारची लांबी 4535 मिमी, रुंदी 1765 मिमी आणि उंची 1475 मिमी आहे.
कारचा व्हीलबेस 2670mm आहे आणि 528 लीटरची मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे. कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड सिस्टम आहे. कारमध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, बोसची 8-स्पीकर साउंड सिस्टीम, टच-आधारित क्लायमेट कंट्रोल सिस्टम, हवेशीर फ्रंट सीट्स आहेत.
शक्तिशाली इंजिन
Hyundai कंपनीकडून नवीन Verna कारमध्ये शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. 1.5-लीटर 4-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर 4-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 113bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करेल. कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
सुरक्षा वैशिष्ट्ये
कारमध्ये ADAS तंत्रज्ञान, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ब्लाइंड स्पॉट अलर्ट, लेन डिपार्चर अलर्ट, ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग, लेन फॉलोइंग असिस्ट, हाय बीम असिस्ट यासारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
हिल स्टार्ट असिस्ट, 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ही सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.













