Post Office Scheme: तुम्ही देखील आता तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून आर्थिक बचत करण्यासाठी जास्त परतावा देणारी योजना शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला या लेखात एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत जे तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करेल. या योजनेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांचा परतवा देखील मिळतो. चला मग जाणून घेऊया या जबरदस्त योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आम्ही येथे तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या MIS योजना योजनेबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही गुंतणवूक करून लाखो रुपयांचा परतावा प्राप्त करू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलाचे खाते उघडू शकता, जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने हे खाते उघडले तर तुम्ही तुमच्या मुलाची फी आणि इतर खर्च सहजपणे करू शकता. यामुळे तुमच्या मुलाचे भविष्य देखील उज्ज्वल होईल.
POMIS योजनेमध्ये तुम्ही फक्त 1,000 रुपयांमध्ये खाते उघडू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता. एका खात्यात 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवून तुम्हाला त्याचे फायदे मिळू लागतात.
व्याज कसे दिले जाते?
या खात्यात तुम्हाला दरमहा व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूक करून कोणतीही भारतीय व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते. पोस्ट ऑफिस MIS ची मॅच्युरिटी पाच वर्षात असते.
या पोस्ट ऑफिस योजनेतून पैसे कसे काढायचे?
तुम्ही 1 वर्ष ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास, ठेव रकमेतून 2 टक्के वजा करून तुमचे पैसे परत केले जातात. तुम्ही 3 वर्षापूर्वी केव्हाही पैसे काढल्यास, तुमच्या ठेव रकमेच्या 1 टक्के वजा केल्यावर तुमचे पैसे परत केले जातात.
दरमहा 2500 रुपये कसे मिळतील
जर तुम्ही या खात्यात 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला 6.6% व्याज दराने दरमहा 2475 रुपये मिळतील आणि पाच वर्षांच्या कालावधीनंतर हे व्याज एकूण 1,48,500 रुपये होईल. ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि योजनेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच गुंतवणूक सुरू करा.
हे पण वाचा :- Wedding Dreams: स्वप्नात स्वतःचे लग्न पाहणे म्हणजे होणार आहे काहीतरी खास ! जाणून घ्या येथे सर्वकाही