उच्चशिक्षित तरुणांचा शेतीमध्ये हटके प्रयोग! कलिंगड अन खरबूज पिकाच्या शेतीतून मात्र 70 दिवसात मिळवले लाखोंचे उत्पन्न, पहा…..

Ajay Patil
Published:

Watermelon Farming : अलीकडे शेतीत रस नाही, शेतीमध्ये पूर्वीप्रमाणे मजा उरलेली नाही, शेती करून आर्थिक प्रगती साधता येणार नाही असे नवयुवक शेतकरी पुत्र बोलू लागले आहेत. विशेष म्हणजे आता प्रयोगशील शेतकरी देखील आपल्या पाल्यांनी चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि शेती ऐवजी नोकरी करावी असे स्वप्न पाहत आहेत.

खरं पाहता, शेतीमध्ये सातत्याने येणारे नैसर्गिक संकटे पाहता, शेतमालाला मिळत असलेले कवडीमोल दर पाहता कदाचित या शेतकरी पुत्रांचे हे म्हणणे बरोबरही असेल पण या संकटावर मार्ग काढत काही तरुणांनी शेतीमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातही दोन तरुण शेतकरी बंधूंनी असाच काहीसा प्रयोग केला आहे. तालुक्यातील मावडी क. पं. गावातील सागर पवार व विशाल पवार या दोन्ही बंधूंनी उच्च शिक्षणानंतर ही शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्हींनी कृषी विषयात पदवी प्राप्त केली आहे.

हे पण वाचा :- अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोणी मुलींची छेड काढली तर ‘या’ मोबाईल नंबरवर संपर्क साधा, पोलीस प्रशासनाचे…

पण शिक्षणानंतर नोकरीं ऐवजी आपल्या ज्ञानाचा शेतीमध्ये वापर करायचा या दृष्टीने या दोन्ही तरुणांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. या तरुण शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा आढावा घेत आपल्या चार एकर शेत जमिनीत कलिंगड आणि खरबूज या पिकाची शेती सुरू केली आहे.

चार एकरात दोन एकरावर कलिंगड आणि दोन एकरात खरबूज पिकाची त्यांनी लागवड केली आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही पिकाच्या लागवडीसाठी त्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दोन एकरात कलिंगड ची रोपांद्वारे लागवड न करता थेट बियाणे लावून लागवड केली आहे.

पारंपारिक पद्धतीने कलिंगड लागवड ही रोपांच्या माध्यमातून होते. मात्र रोप लागवड करण्याऐवजी या तरुणांनी थेट बियाण्याची लागवड केली यामुळे त्यांना चांगला फायदा देखील झाला आहे. त्यांना एकरी एक लाख रुपये इतका खर्च या दोन्ही पिकांसाठी आला आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! राज्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार अनुदान; पहा तुम्ही आहात का यादीत

म्हणजेच चार एकरात जवळपास चार लाखांचा खर्च त्यांना आला असून यापासून आता त्यांना उत्पादन मिळू लागले आहे. लागवडीनंतर जवळपास 70 दिवसांनी या दोन्ही पिकातून उत्पादन त्यांना मिळाले आहे. या ठिकाणी विशेष बाब अशी की हाती आलेले उत्पादन त्यांनी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विक्री करणे ऐवजी थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे त्यांना बाजारापेक्षा अधिक भाव मिळत असून थेट त्यांच्या बांधावरच मालाची विक्री होत असल्याने वाहतुकीचा खर्च देखील त्यांचा वाचला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना जवळपास एकरी 20 ते 25 टन पर्यंत या पिकातून उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे खर्च वजा जाता त्यांना मोठी कमाई होण्याची आशा आहे.

खरं पाहता आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीत कलिंगड आणि खरबूज बाजारात विक्री होतात. याचा फायदा आता या तरुणांना होणार असून यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई होईल असे चित्र सध्या तयार झाले आहे. एकंदरीत कृषी पदवीधर असलेला या तरुणांचा शेती मधला हा प्रयोग इतरांसाठी मार्ग दाखवणारा राहणार आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग! केंद्र पाठोपाठ राज्यानेही वाढवला महागाई भत्ता; सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली ‘इतकी’ वाढ, वाचा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe