BS6 Phase-2 Rules : ग्राहकांना धक्का, 1 एप्रिलपासून ‘ह्या’ लोकप्रिय कार्स होणार बंद ! खरेदीपूर्वी पहा संपूर्ण लिस्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BS6 Phase-2 Rules :  देशात 1 एप्रिलपासून अनेक बदल पाहायला मिळणार आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो 1 एप्रिलपासून भारतीय ऑटो मार्केटमध्ये नवीन BS6 फेज-2 नियम लागू होणार आहे ज्यामुळे बाजारामधून अनेक लोकप्रिय कार्स गायब होणार आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या होंडा, ह्युंदाई, महिंद्रा, टाटा आणि स्कोडा या कार कंपन्यांच्या अनेक कार मॉडेल्स बंद होणार आहे. यामुळे तुम्ही देखील यापैकी एक कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर कार खरेदीपूर्वी हा लेख वाचा आणि नवीन नियमांमुळे कोणते मॉडेल बंद होणार असल्याची शक्यता आहे याची माहिती जाणून घ्या.

होंडाच्या 5, महिंद्राच्या 3, ह्युंदाई आणि स्कोडाच्या 2-2 कार्स बंद होऊ शकतात

Honda, Mahindra, Hyundai, Skoda, Renault, Nishan, Maruti Suzuki, Toyota आणि Tata सारख्या भारतीय ऑटोमोबाईल कंपन्या नवीन BS6 फेज-2 नियम आणि RDE नियम एप्रिलपासून लागू झाल्यामुळे त्यांचे काही मॉडेल्स बंद करू शकतात. यामध्ये मुख्यतः डिझेल इंजिन असलेल्या कारचा समावेश होतो. आम्ही तुम्हाला सांगतो की सर्व कंपन्या त्यांच्या कारचे काही मॉडेल्स बंद करत आहेत.

ही कार मॉडेल्स बंद केली जाऊ शकतात

एप्रिल महिन्यापासून नवीन वाहन नियम जारी केल्यानंतर, विविध कार कंपन्यांचे सुमारे 16 मॉडेल बंद केले जाऊ शकतात. यामध्ये Honda City 4th gen, Honda City Diesel 5th Gen, Honda Amaze Diesel, Honda Jazz, Honda WR-v, Mahindra Marazzo, Mahindra Alturas G-4, Mahindra KUV100, Hyundai Verna Diesel, Skoda Octavia, Altatroz Super डिझेल, Renault Kwid 800, Nissan Kicks, Maruti Alto 800, Innov Crysta Petrol सारख्या कार्सची नावे समाविष्ट आहेत.

BS6 फेज -2 RDE Norms काय आहेत

देशातील वाढत्या प्रदूषणामुळे एप्रिल महिन्यापासून हे नियम लागू केले जात आहेत. सरकार BS6 फेज-2 नियमांनुसार रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) लागू करणार आहे. याचा अर्थ आता विकल्या जाणार्‍या वाहनांना ऑन-रोड उत्सर्जन नियमांची पूर्तता करावी लागेल. रस्त्यांवर वाहनांची रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई) टेस्टिंग केली जाईल. या टेस्टिंगमध्ये वाहनातून निघणाऱ्या धुरातील प्रदूषक विहित मर्यादेपेक्षा जास्त बाहेर पडत नाहीत ना हे पाहिले जाईल. 1 एप्रिलपासून सर्व नवीन गाड्यांना या मानकांची पूर्तता करावी लागणार आहे.

हे पण वाचा :- Indian Railways Rules: प्रवास करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर होणार ..