Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे आता याठिकाणी पोटनिवडणूक होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणुक घ्यावी लागते.
आता लोकसभा निवडणूक २०२४ मे-एप्रिल मध्ये होत आहे. आत्ता मार्च चालू असल्यामुळे एक वर्षावरुन अधिक काळ आहे. त्यामुळे ही निवडणुक घ्यावी लागेल आणि ही निवडणूक ६ महिन्याच्या आत घ्यावी लागते. यामुळे निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.
असे असताना आता उमेदवार होणार असणार याची देखील चर्चा सुरू झाली आहे. गिरीश बापट यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते, पण पक्षातील अन्य नावांचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजून यावर कोणतेही नाव पुढे आले नाही.
यामध्ये संजय काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहळ, आमदार माधुरी मिसाळ यांची नाव चर्चेत आहेत. यामुळे पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी पक्ष विचारपूर्वक उमेदवार देण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे कसबा निवडणूकीत झालेला पराभव.
दरम्यान, बापटांच्या घरातील उमेदवार हा सक्रिय राजकारणात नाही. बापटांचे सुपुत्र गौरव बापट हे राजकारणात सक्रीय नाहीत. त्यामुळे बापटांच्या कुटुंबाऐवजी अन्य दुसऱ्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे काय होणार लवकरच समजेल.