Jyotish Tips : भारतीय प्राचीन परंपरेत संस्कृती तसेच संस्कार यांना खूप जास्त महत्त्व आहे. प्रत्येकजण देवतांचे पूजन, भजन करत असतो. या सर्व देवतांमध्ये लक्ष्मी देवीला सर्वात जास्त महत्त्व आहे. इतकेच नाही तर लक्ष्मी देवीच्या पूजनाचे महत्त्व आणि वेगळेपण अनेकविध ग्रंथात विषद केले आहे.
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनचर्येत वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होत असतो. परंतु, सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात अगोदर काही गोष्टी केल्या तर त्याचा चांगला लाभ आपल्याला होतो, या गोष्टी कोणत्या आहेत? जाणून घ्यात्याबाबत सविस्तर…
ज्योतिषाचार्य पंडित रामदास यांच्या मतानुसार, माणूस हा त्याच्या स्वभावाने, सवयींनी तसेच त्याच्या कर्माने भाग्य घडवत असतो आणि खराब करत असतो. तुमचे आता नशीब बदलू शकते त्यासाठी तुम्हाला दररोज सकाळी उठल्याबरोबर काही कामे सक्तीने करावी लागणार आहेत.
सूर्योदयापूर्वी उठा
ब्रह्म मुहूर्तावर जागरण केले तर माणसाची सर्व कामे सिद्ध होतात. तसेच त्या व्यक्तीचे मन हे पूर्णपणे ताजे आणि उर्जेने भरलेले असते. त्याला जे काही काम सुरू करायचे आहे, ते काम तो जास्त जोमाने आणि उत्साहाने करू शकतो.
सकाळी उठल्याबरोबर दोन्ही हातांचे तळवे बघा
दुसरे म्हणजे सकाळी उठल्याबरोबर सर्वात अगोदर दोन्ही हातांचे तळवे एकत्र करून बघा. असे करणे हे सौभाग्य मिळविण्याची एक खात्रीशीर युक्ती आहे. जो व्यक्ती सकाळी उठल्याबरोबर हे करतो, त्याच्या आयुष्यात कोणतीच अडचण येत नाही.
देवाचे स्मरण करा
तुम्ही तुमच्या दोन्ही हातांचे तळवे पाहिल्यानंतर, तुमच्या प्रमुख देवतेचे स्मरण करा. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळावे तसेच जीवनात पुढे जाण्यासाठी मदत व्हावी यासाठी प्रार्थना करा.