आनंदाची बातमी ! 8 वी पास तरुणांना एसटी महामंडळात नोकरीची संधी; जाहिरात पहा अन आजच अर्ज करा

Ajay Patil
Published:
ST Recruitment

St Mahamandal Bharati 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः आठवी आणि दहावी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी गुड न्यूज आहे. एसटी महामंडळात एक मोठी भरती निघाली आहे. महामंडळातील जळगाव आगारात ही भरती असून यासाठीची अधिसूचना किंवा जाहिरात नुकतीच निर्गमित म्हणजे जारी झाली आहे.

दरम्यान आज आपण या एसटी महामंडळाच्या जळगाव आगारातील भरती संदर्भात सर्व इत्यंभूत माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. किती पदांसाठी आणि कोणत्या पदांसाठी भरती आहे? भरतीसाठी अर्ज कसा करायचा? आवश्यक शैक्षणिक पात्रता याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज; ‘हे’ सहा दिवस पडणार मुसळधार पाऊस !

किती आणि कोणत्या पदांसाठी आहे भरती?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटीच्या जळगाव आगारात तब्बल विविध पदाच्या 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मेकॅनिक (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर या रिक्त पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारां उमेदवार आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेड मधील आयटीआय पूर्ण केलेला असल्याने गरजेचे आहे. शैक्षणिक पात्रते संदर्भात आणि वयोमर्यादेबाबत इतर आवश्यक माहिती सविस्तर वाचण्यासाठी एकदा अधिसूचना मात्र पहावी लागणार आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रासाठी चिंताजनक! आणखी ‘इतके’ दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा गंभीर इशारा

अर्ज कसा करायचा?

एसटी महामंडळाच्या जळगाव आगारात निघालेल्या या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ज्या उमेदवारांना वेल्डर या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी shorturl.at/adjLX या लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे. तसेच जे इच्छुक आणि पात्र उमेदवार मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी अर्ज करू इच्छित आहेत त्यांनी shorturl.at/fqt12 या लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे.

यासोबतच मेकॅनिक डिझेल या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी shorturl.at/moX49 या लिंकवर आपला अर्ज सादर करायचा आहे. मेकॅनिक या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी shorturl.at/dfgy2 या लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करण्यापूर्वी इच्छुकांनी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे मात्र गरजेचे राहणार आहे. अधिसूचनेत नमूद केलेली पात्रता धारण केलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत. 

हे पण वाचा :- खुशखबर! ‘या’ 1 लाख 77 हजार शेतकऱ्यांना मिळाली राज्य शासनाकडून 629 कोटीची मदत; तुम्हाला मिळणार की नाही, पहा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe