PM Mudra Yojana : केंद्र सरकार देशात स्वंय रोजगार सुरु करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन करत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत त्यांच्या मदतीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देत आहे. या योजने अंतर्गत लोकांना एकूण तीन प्रकारचे कर्ज मिळते.
जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करणार असाल, किंवा तुमचा आधीपासून सुरु असणारा व्यवसाय विस्तारित करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला या योजनेतून याचा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त एक अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय 10 लाखांचे कर्ज मिळेल.

या योजनेत अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक विशेष प्रकारचे मुद्रा कार्ड दिले जाते. तुम्ही हे कार्ड तुम्ही डेबिट कार्डप्रमाणे वापरू शकता.
या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारण्यात येत नाही. लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही आता या योजनेअंतर्गत 50,000 ते 10 लाख रुपयांचे कर्ज सहज घेऊ शकता.
या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असावी. हे लक्षात घ्या की या योजनेंतर्गत कर्जाचा लाभ फक्त बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कामांसाठी देण्यात येतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mudra.org.in/ ला भेट देऊन तुम्ही या योजनेत सहज अर्ज करू शकता.