आनंदाची बातमी ! ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु; थेट मुलाखतीने होणार भरती, पहा डिटेल्स

Thane Municipal Corporation Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्या तरुणांना ठाण्यात नोकरी करायची असेल अशांसाठी ही बातमी विशेष खास आहे. कारण की, ठाणे महानगरपालिकेमध्ये पदभरती काढण्यात आली आहे. याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील अटेंडट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे यां पदभरती अंतर्गत उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे. म्हणजेच यासाठी कोणतीच लेखी परीक्षा आयोजित केली जाणार नाही, तर थेट मुलाखतीने उमेदवारांची निवड करणे प्रस्तावित आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचे आहेत. दरम्यान आज आपण या भरती बाबत सर्व आवश्यक माहिती जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- पंजाबराव डख कोण आहेत? त्यांच शिक्षण काय, ते काय काम करतात, त्यांचा मोबाईल नंबर काय? वाचा सविस्तर

किती पदांसाठी होणार भरती?

ठाणे महानगरपालिका अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील अटेंडट या पदाच्या 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती – 2, अनुसूचित जमाती – 2, भटक्या जमाती (ड) – 1, विशेष मागास प्रवर्ग – 1, इतर मागास प्रवर्ग – 6, आदुघ- 2, खुला – 10 अशा पद्धतीने रिक्त जागा भरण्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा.

शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबंधी कामाचा 3 वर्षांचा 

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ भागात वादळी पाऊस आणि गारपीट होणार! भारतीय हवामान विभागाचा गंभीर ईशारा

अनुभव

मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

एम एस सी आय टी किंवा तत्सम बेसिक शासनमान्य कम्प्युटर कोर्स केलेला असणे बंधनकारक राहणार आहे.

ओपन कॅटेगिरी मधील उमेदवार कमाल 38 वर्षे वयाचा आणि रिजर्व कॅटेगिरी मधील उमेदवार कमाल 42 वर्षे वयाचा यासाठी पात्र राहणार आहे.

किती वेतन मिळणार

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा वीस हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.

मुलाखत केव्हा अन कुठं होणार?

कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे या पदासाठीची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखत 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेले आवश्यक कागदपत्रे घेऊन हजर राहणे अनिवार्य राहणार आहे.

जाहिरात कुठे पाहणार?

Pdf स्वरूपात जाहिरात पाहण्यासाठी ठाणे महानगरपालिका अटेंडंट जाहिरात 2023 या लिंक वर क्लिक करा.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रो 1 ‘या’ दिवशी धावणार; असे राहतील तिकीट दर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe