Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कापूस लागवड विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून कापसाला चांगला समाधानकारक दर मिळत असल्याने याची लागवड वाढली आहे.
मात्र कापसाची उत्पादकता आपल्या देशात खूपच कमी आहे. ब्राझील, चीन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, उजबेकिस्तान, अर्जेंन्टिना आणि ग्रीस या प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये कापूस उत्पादकता खूपच अधिक आहे. मात्र आपल्या देशातील कापूस या प्रमुख कापूस उत्पादक देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
परिणामी शेतकऱ्यांना कापसाची शेती परवडत नसल्याचे चित्र आहे. एका अधिकृत आकडेवारीनुसार आपल्या देशात कापसाची उत्पादकता एकरी चार क्विंटल म्हणजेच हेक्टरी दहा क्विंटल पर्यंत आहे. यामुळे देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वकांक्षी असा प्रकल्प राबवला जाणार आहे.
कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी आता देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यात हाय डेन्सिटी प्लँटिंग सिस्टम म्हणजेच अतिसघन कापूस लागवड या तंत्राचा वापर केला जाणार आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील या प्रकल्पांतर्गत अतिसंघण कापूस लागवड केली जाणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सध्या देशात 120 बाय 45 सेंटीमीटर या अंतरावर कापसाची लागवड होत आहे.
मात्र या अंतरावर कापूस लागवड केली तर कापसाचे उत्पादन हेक्टरी दहा क्विंटल एवढेच मिळते. यामुळे कापसाची जर अतिसंघन लागवड केली तर उत्पादकता आपसूकच वाढेल असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील एकूण सहा राज्यात अतिसघन कापूस लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
याच्या माध्यमातून आता देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यात 90 बाय 15 किंवा 90 बाय 30 सेंटिमीटर अंतरावर कापूस लागवड केली जाणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर शेतकऱ्यांनी 90 बाय 15 या अंतरावर कापूस लागवड केली तर 74 हजार कापसाची झाडे आणि 90 बाय 30 सेंटिमीटर अंतरावर कापूस लागवड केली तर 37000 कापसाची झाडे बसणार आहेत.
महाराष्ट्रासह सहा राज्यात एकूण 6 हजार हेक्टर क्षेत्रावर 90 बाय 15 या अंतरावर कापूस लागवड केली जाणार आहे. राज्यातील दहा जिल्ह्यात एकूण 2000 हजार हेक्टर क्षेत्रावर या अंतरावर अतिसघन पद्धतीने कापूस लागवड होणार आहे. तसेच 90 बाय 30 या अंतरावर संपूर्ण देशभरातील सहा राज्यात 4500 हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होणार आहे.
हे पण वाचा :- 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये 2859 पदाची मेगा भरती, आजच Apply करा
यामध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात एकूण 1700 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पांतर्गत केल्या जाणाऱ्या लागवडीत 150 ते 160 दिवसात काढणीयोग्य वाणांची लागवड करणे प्रस्तावित आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत तांत्रिक व्यवस्थापनाचे काम केंद्रीय कापूस संशोधन संस्था करणार आहे.
यासाठी केंद्र शासनाकडून निधी पुरवला जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळणार आहे. येत्या हंगामापासून हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून देण्यात आली आहे. निश्चितच या प्रकल्पाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवले जाईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, खरीप हंगामात ‘हे’ एक काम कराच लाखोत होणार कमाई; पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला