पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ! वरिष्ठ लिपिक आणि ‘या’ पदासाठी निघाली भरती; आजच करा Apply

Ajay Patil
Published:
Graduate Job In Maharashtra Agriculture Department

Graduate Job In Maharashtra Agriculture Department : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. जे तरुण सरकारी नोकरीची तयारी करत आहेत तसेच पदवी तर आहेत अशा तरुणांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागात पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. राज्याच्या कृषी विभागात विविध पदे भरण्यासाठी नुकतीच एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या कृषी विभागात वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान आज आपण या पदभरती बाबत अल्पशी माहिती तपशीलवार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कापूस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र शासन राबवणार ‘हा’ महत्त्वाचा प्रकल्प; वाचा याविषयी सविस्तर

किती रिक्त पदांसाठी आहे भरती?

राज्याच्या कृषी विभागात वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक या दोन पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ लिपिक या पदाच्या 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत तसेच सहाय्यक अधीक्षक या पदाच्या सहा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

वरिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा तसेच मसुदा लेखन आणि पत्रव्यवहाराच्या कामाचा त्याला अनुभव असावा. विधी शाखेतून पदवीधर असलेल्या उमेदवारांना या पदासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या पदासाठीची शैक्षणिक पात्रता तपशीलवार समजून घेण्यासाठी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक राहणार आहे.

सहाय्यक अधीक्षक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा तसेच मसुदा लेखन आणि पत्र व्यवहाराच्या कामाचा त्याला अनुभव असावा. या पदासाठीची शैक्षणिक पात्रता तपशीलवार समजून घेण्यासाठी एकदा मात्र अधिसूचना वाचणे आवश्यक राहणार आहे.

हे पण वाचा :- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! उन्हाळी कांद्याप्रमाणे आठ महिने टिकवण क्षमता असलेले कांद्याचे नवीन लाल वाण विकसित; शेतकऱ्यांचा होणार फायदा

आवश्यक वयोमर्यादा

वर नमूद करण्यात आलेल्या दोन्ही पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावा. वयोमर्यादेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

किती पगार मिळणार

वर नमुद करण्यात आलेल्या पदांसाठी 25 हजार 500 ते एक लाख 12 हजार 400 एवढं वेतन शासनाच्या माध्यमातून देय राहणार आहे. यासाठी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे करायचा

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. https://krishi.maharashtra.gov.in/Site/Common/ViewGr.aspx?Doctype=a3960c65-5ba5-4d71-99a4-3ec4212c0bc6?MenuID=1026 या लिंक वर जाऊन पात्र उमेदवार अप्लाय करू शकणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक?

या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 20 एप्रिल 2023 पर्यंत या पदासाठी अर्ज इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सादर करता येणार आहेत.

हे पण वाचा :- शेतकऱ्याच्या पोराचं भन्नाट संशोधन! गाड्यांसाठी बनवलं खास सेन्सर; आता गाडीचा अपघात झाला की कुटुंबातील व्यक्तींना जाणार ऑटोमॅटिक मॅसेज, पहा…..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe