पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर ! ‘या’ सरकारी बँकेत निघाली मोठी भरती; आजच करा इथं अर्ज, पहा…

Published on -

Banking Job : पदवीधर उमेदवारांसाठी तसेच बँकेत जॉब शोधणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील एक महत्त्वाच्या सरकारी बँकेत मोठी पदभरती आयोजित झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या देशातील एक मोठ्या सरकारी बँकेत ही पदभरती आयोजित झाली असून तब्बल 5000 रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

दरम्यान या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन जाणकार लोकांच्या माध्यमातून केले जात आहे. या परिस्थितीत आज आपण या पदभरती बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस पडणार; पण ‘या’ जिल्ह्यात पाऊस घेणार विश्रांती, पहा IMDचा अंदाज

कोणत्या पदासाठी आहे भरती?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेत बिझनेस करस्पॉन्डंट / फँसिलिटेटर या पदाच्या रिक्त 5000 जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण घेतलेला उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे. शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचावी लागणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा?

या भरतीसाठी वीस वर्षे ते 28 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच आरक्षित उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट देखील राहणार आहे.

किती पगार मिळणार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दहा हजार ते पंधरा हजार रुपये प्रति महिना इतकं वेतन दिल जाणार आहे.

हे पण वाचा :- पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धुळे अन ‘या’ जिल्ह्यात पुढील 4 ते 5 तासात कोसळणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाचा इशारा

अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6412cbf5977ed17c321d25e2 या लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करू शकतात.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?

21 एप्रिल 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. वास्तविक तीन एप्रिल 2023 पर्यंत यासाठी मुदत देण्यात आले होती. मात्र यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून या भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झाली चांदी ! ‘या’ स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मिळालेत 1 कोटी 60 लाख, पहा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!