Kia EV6 2023 : कियाच्या आता इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होत आहेत. कंपनीच्या जवळपास सर्वच कार इतर कंपन्यांना टक्कर देत आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वी Kia EV6 ही जबरदस्त कार लाँच केली होती. कंपनीची ही सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार मानली जाते.
रेंजबाबत विचार करायचा झाला तर या कारमध्ये 700 किमीची शानदार रेंज मिळत आहे. अशातच आता कंपनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता पुन्हा एकदा या कारच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. जाणून घ्या सविस्तरपणे.
किती आहे Kia EV6 2023 रेंज?
नवीन Kia EV6 हे Kia च्या समर्पित EV प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. या कारच्या रेंजबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीची ही कार 708 किमी पर्यंत चांगली रेंज देते.
पहा वैशिष्ट्ये
आता कंपनीकडून या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. यात कंपनीने मुख्य इन्फोटेनमेंट, ड्रायव्हर डिस्प्लेसाठी फ्लोइंग वक्र HD डिस्प्ले स्क्रीन दिली आहे. इतकेच नाही तर पॅनोरॅमिक सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, चार्जिंग ऑप्शन यांसारखे अनेक कूल फीचर्स दिले आहेत.
किती आहे किंमत?
कंपनीकडून या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 60.95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याच वेळी, जर तुम्हाला त्याचे टॉप मॉडेल खरेदी करायचे असेल तर, तुम्हाला 65.95 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. इतकेच नाही तर तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही कार सहज बुक करू शकता. तुम्हाला डीलर्सना भेट देऊन टोकन मनी देऊन ही कार बुक करता येईल. इतकेच नाही तर या कारचा लूकही खूपच स्टायलिश दिला आहे.