Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Direct Tax Collection : मोदी सरकारला देशातील या शहरांमधून मिळते सर्वाधिक आर्थिक कमाई, एकट्या मुंबईतून मिळते तब्बल 5 लाख कोटी…

देशात अशी ४ शहरे आहेत जी सर्वाधिक कर मिळवून देणारी शहरे म्हणून ओळखली जातात. तसेच या शहरांमुळे देशाच्या आर्थिक तिजोरीत मोठी भर पडत आहे.

Direct Tax Collection : देशातील केंद्र सरकारला अनेक राज्यांमधून आर्थिक कर मिळत असतो. केंद्र सरकारला प्रत्येक राज्यांमधून वेगवेगळ्या रकमेमध्ये कर मिळत असतो. कर गोळा करणे हे केंद्र सरकारच्या कमाईचे मुख्य साधन आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

देशात अशी काही शहरे आहेत जी केंद्र सरकारला कराच्या स्वरूपात अधिक रक्कम देत आहेत. देशातील मुख्य ५ शहरांचा समावेश यामध्ये आहे. त्यामध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.

देशातील ५ शहरे केंद्र सरकारला अधिक कर मिळवून देत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला मोठा लाभ होत आहे. कोणत्या शहरातून कराच्या स्वरूपात किती लाभ केंद्र सरकारला होतो ते पाहूया…

ही आहेत टॉप 5 शहरे

मुंबई : 4.95 लाख कोटी रुपये
दिल्ली: 2.07 लाख कोटी रुपये
बेंगळुरू: 2.04 लाख कोटी रुपये
चेन्नई: 1.05 लाख कोटी रुपये
हैदराबाद: 88,438 कोटी रुपये

बेंगळुरू दिल्लीला मागे टाकू शकते

सध्या देशामध्ये सर्वाधिक कर संकलन करणारे शहर हे मुंबई आहे. तसेच त्यानंतर दिल्लीचा नंबर लागतो. मात्र बेंगळुरूचे कर संकलन पाहता दिल्लीला मागे टाकू शकते असे संकेत मिळत आहेत. लवकरच बेंगळुरू दुसऱ्या क्रमांकाचे कर संकलन शहर बनू शकते असे बिझनेस स्टँडर्डच्या अहवालात म्हटले आहे.

बंगळुरूचे योगदान कोठून पोहोचले?

बेंगळुरू शहराचे कर संकलन झपाट्याने वाढत आहे. 2007-08 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात बेंगळुरूचे 32692 कोटी रुपये होते. जे 2022-23 मध्ये वाढून 2.04 लाख कोटी रुपये झाले. वैयक्तिक उत्पन्न आणि कॉर्पोरेशन करासह बेंगळुरूच्या प्रत्यक्ष कर संकलनात 525 टक्के वाढ झाली आहे.

देशाचे सकल कर संकलन किती आहे

देशातील कर संकलनावर एक नजर टाकूया. गेल्या आर्थिक वर्षात 10 जानेवारीपर्यंत देशाचे सकल कर संकलन 24.58 टक्क्यांनी वाढून 14.71 लाख कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे.

परतावा समायोजित केल्यानंतर, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 12.31 लाख कोटी रुपये झाले. हे 2021-22 च्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 19.55 टक्के अधिक आहे.

2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 86.68 टक्के निव्वळ संकलन होते. अर्थसंकल्पात, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रत्यक्ष कर संकलन 14.20 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.