Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. विशेषता ज्यांचे शिक्षण कमी झाले असेल अशा तरुणांसाठी ही मोठी खास बातमी राहणार आहे.
कारण की, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात काही रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ ड्राइवर पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. म्हणजे या पदासाठी आठवी पास उमेदवार पात्र राहणार आहेत.
त्यामुळे ज्या तरुणांचे कमी शिक्षण असेल मात्र त्यांना नोकरी हवी असेल अशा तरुणांना केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयात ही नोकरीची मोठी सुवर्णसंधी राहणार आहे. दरम्यान आज आपण या भरती बाबत सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी आज निघणार; घरबसल्या म्हाडाची सोडत कशी पाहणार? पहा….
कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी होणार भरती?
स्टाफ ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड) या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून मंत्रालयात रिक्त असलेल्या आठ जागा भरल्या जाणार आहेत. मात्र या आठ जागा तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी भरल्या जातील याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा किमान आठवी उत्तीर्ण असणे जरुरीचे आहे. सोबतच उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे जरुरीचे आहे. उमेदवाराला ड्रायव्हिंग मध्ये तीन वर्षाचा अनुभव असणे जरुरीचे आहे. तसेच यासाठी अर्ज करणार उमेदवार हा 56 वर्षांपेक्षा कमी वयाचा असावा.
हे पण वाचा :- कडू कारल्याचा मधुर गोडवा ! प्रयोगशील शेतकऱ्याने 10 गुंठ्यात सुरु केली कारल्याची शेती, 2 लाखांची झाली कमाई, पहा ही यशोगाथा
किती पगार मिळणार?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 19900 रुपये ते 63200 रुपये यादरम्यान वेतन दिले जाणार आहे.
अर्ज कसा वापरावा लागणार?
यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मंत्रालयाने या भरतीसाठी एक विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. हा अर्ज उमेदवाराला काळजीपूर्वक भरायचा आहे आणि तो केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात पाठवायचा आहे.
अर्ज कसा भरायचा, नमुन्यातील अर्ज कुठे उपलब्ध होणार यासारख्या इतर महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्यासाठी इच्छुकांना मात्र अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार