12वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये निघाली मोठी भरती, ‘या’ रिक्त पदाच्या 1600 जागांसाठी भरतीची घोषणा, पहा…

Staff Selection Commission Recruitment : बारावी पास असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त उच्चतर माध्यमिक स्तर परीक्षा येथे रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे.

ज्या तरुणांना सरकारी नोकरीची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी राहणार आहे. विशेषता ज्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये काम करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही निश्चितच आनंदाची पर्वनी आहे.

विशेष बाब अशी की यासाठी अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आले आहे. सदर अधिसूचनेनुसार या विभागात विविध पदाच्या 1600 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- गणपती बाप्पा पावला…! मुंबई-गोवा महामार्गाचे ‘हे’ महत्त्वाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार, नितीन गडकरींनी दिलेत आदेश

कोणत्या रिक्त जागांसाठी होणार भरती

कनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदाचा रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

या दोन्ही पदाच्या जवळपास 1600 रिक्त जागा या पदभरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरल्या जाणार असल्याची माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

वर नमूद केलेल्या पदांसाठी दहावी आणि बारावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. शैक्षणिक पात्रते बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मात्र उमेदवारांना एकदा अधिसूचना वाचावी लागणार आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! ‘हा’ स्टॉक एका वर्षात 31 हजार 355 रुपयांनी वाढला, गुंतवणूकदार बनलेत मालामाल; पहा या मल्टीबॅगर स्टॉकची कुंडली

किती पगार मिळणार 

अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना एवढ वेतन मिळणार आहे. तसेच डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना 29,200 – 92,300 रुपये प्रतिमहिना इतकं वेतन दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अर्ज कुठे करावा लागणार

https://ssc.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

आठ जून 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. विहित कालावधीनंतर उमेदवारांना अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! 10 वी आणि 12वी चा निकाल जून महिन्यातील ‘या’ तारखेला लागणार, पहा डिटेल्स