Maharashtra HSC SSC Result : काल अर्थातच 12 मे 2023 रोजी सीबीएससी बोर्डाचा 12वी चा निकाल लागला. यामुळे आता महाराष्ट्र बोर्डाचे दहावी आणि बारावीचे रिझल्ट केव्हा लागतील असा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडला आहे.
वास्तविक सीबीएससी बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतरच महाराष्ट्र बोर्डाचे निकाल जाहीर होतात. आतापर्यंत जेवढेही रिझल्ट लागले आहेत त्यामध्ये असंच आढळून आल आहे की, सीबीएससी बोर्डाचे निकाल आधी लागतात आणि सीबीएससीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र बोर्डचे निकाल लागतात.
दरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात पुढील आठवड्यात तारीख जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा :- शेअर मार्केटमध्ये एक सामान्य व्यक्ती किती रुपये गुंतवू शकतो? काय आहेत शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचे सरकारी नियम, पहा…
म्हणजेच पुढील आठवड्यात बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे. मात्र याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावीचे रिझल्ट डिक्लेअर होतील असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
बारावीचे रिझल्ट 3 किंवा 4 जूनला आणि दहावीचे रिझल्ट हे 10 जून च्या आसपास लागतील असं सांगितलं जात आहे. दरम्यान आज आपण महाराष्ट्र बोर्डाचे रिझल्ट जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी कशा पद्धतीने आपला रिझल्ट चेक करणार? यासाठी काय प्रोसेस असणार याविषयी जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका वाढला! ‘या’ भागात पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा
येथे पाहता येणार 10वी आणि बारावीचा निकाल
दहावी- बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल जून महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होणार आहेत. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे.
याशिवाय इतरही वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना निकाल पाहणे शक्य होणार आहे. mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या संकेतस्थळांवरही निकाल विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे पाहता येणार आहेत.
हे पण वाचा :- मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! आता ‘या’ लिंक रोड प्रकल्पामुळे नवी मुंबईचा प्रवास होणार मात्र 25 मिनिटात, पहा….
कसा बघायचा निकाल
दहावी आणि बारावीचा रिझल्ट डिक्लेअर झाला की विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही एका संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर भेट द्यायची आहे.
वेबसाईटवर भेट दिली की रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तिथे एसएससी रिझल्ट 2023 किंवा एचएससी रिजल्ट 2023 अशा आशयाची लिंक दिसणार आहे. या लिंक वर क्लिक करायचे आहे.
यानंतर, विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक तसेच आईच नाव टाकून आपला दहावी किंवा बारावीचा रिझल्ट चेक करता येणार आहे.
हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जुलै महिन्यात शिंदे सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय, वेतनात होणार वाढ