Indian Railway Rule : भारतात रेल्वे हे प्रवासासाठी सर्वात सुरक्षित साधन म्हणून ओळखले जाते. बस, विमान किंवा इतर अन्य प्रवासी साधनाच्या तुलनेत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण की, रेल्वेचा प्रवास हा कमी पैशात आणि अधिक गतिमान आहे.
यासोबतच रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित समजला जातो. म्हणून रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि सोयीसाठी वेगवेगळी नियम आणि सुविधा देखील सुरु करत असते. जस की आपणास ठाऊकच आहे की, भारतीय रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागतो.
अनेकदा तर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड आणि तुरुंगवास देखील भोगाव लागतो. मात्र अनेकदा रेल्वे प्रवासी तिकीट काढतात परंतु त्यांचे तिकीट हरवते. या परिस्थितीत रेल्वेचे नियम काय सांगतात. तिकीट चे पैसे भरून तिकीट प्राप्त केलेल्या पण तिकीट हरवलेल्या प्रवाशांना देखील दंड भरावा लागतो का? तिकीट हरवल्यास पुन्हा तिकीट प्राप्त करता येते का? किंवा अन्य काय प्रावधान भारतीय रेल्वेने केले आहेत याबाबत अनेक रेल्वे प्रवासी अनभिज्ञ आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे तिकीट हरवल्यास रेल्वेचे नियम काय सांगतात? अशा प्रवाशांनी काय केले पाहिजे? याबाबत थोडक्यात पण सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेल्वेचे तिकीट हरवल्यास काय करायचे?
रेल्वेचे तिकीट हरवल्यास प्रवाशांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. आणखी रेल्वेचे तिकीट हरवल्यास प्रवासी डुप्लिकेट तिकीट प्राप्त करू शकता. यासाठी मात्र प्रवाशांना काही चार्जेस द्यावे लागतात. चार्जेस प्रवासाच्या रुटनुसार आणि स्त्रीनेनुसार बदलतात. परंतु जर रेल्वेचे तिकीट हरवले तर प्रवासी डुप्लिकेट तिकीट काढून आपला प्रवास पूर्ण करू शकतात. यासाठी रेल्वे प्रवाशांना तिकीट चेकर सोबत किंवा तिकीट कामदरवर संपर्क साधावा लागणार आहे.
किती रुपयांना मिळणार डुप्लिकेट तिकीट
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे प्रवाशांना डुप्लिकेट तिकीटसाठी वेगवेगळ्या श्रेणीसाठी वेगवेगळे चार्जेस द्यावे लागतात. यात तुम्हाला थर्ड आणि स्लीपर क्लासचे डुप्लिकेट तिकीट 50 रुपयांमध्ये मिळते. मात्र या वरील श्रेणीसाठी रेल्वे प्रवाशांना डुबलीकेट तिकीट 100 रुपये दंड भरून मिळते.
तसेच जर रिझर्वेशन चार्ट तयार केल्यानंतर कन्फर्म केलेले तिकीट हरवले असेल, तर मात्र भाड्याच्या 50% रक्कम रेल्वेच्या प्रवाशांना भरावी लागते आणि तेव्हा मग डुबलीकेट तिकीट अशा व्यक्तींना दिले जाते. यासोबतच जर तिकीट फाटलं असेल तर डुप्लिकेट तिकीट 25 टक्के भाडे भरून प्राप्त करता येऊ शकते.
जर तुमचं हरवलेलं तिकीट तुम्हाला सापडलं मात्र तुम्ही नवीन डुप्लिकेट तिकीट बनवल आहे तर अशा परिस्थितीत दोन्ही तिकीट तिकीट काउंटर वर दाखवून आपण डुप्लिकेट तिकीटचे पैसे रिफंड म्हणून परत घेऊ शकणार आहात. याशिवाय, जर तिकीट चेकर तुमच्याजवळ येण्यापूर्वीच जर तिकीट हरवलं असेल तर आपण आपल्या जवळील आयडी प्रूफ तिकीट चेकरायला दाखवू शकता.
जर तुम्ही तिकीट काढलेल असेल तर त्यांच्याकडे त्यासंबंधीचा डाटा असतो त्यामध्ये तुमचं नाव मॅच झालं तर तुम्हाला दंड बसणार नाही आणि त्यांच्याकडून तुम्हाला एक स्लिप दिली जाईल जेणेकरून तुमच्या पुढील प्रवासासाठी हेच तिकीट म्हणून तुमच्यासाठी काम करेल. एकंदरीत भारतीय रेल्वेचे नियम रेल्वे प्रवाशांच्या सोयीनुसार बनवण्यात आले आहेत.
रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचा भारतीय रेल्वेने काळजीपूर्वक विचार केला असून या अडचणींवर मात करण्यासाठी काही नियम हे रेल्वे प्रवाशांच्या हिताचे देखील आहेत. यामुळे जर आपले रेल्वे प्रवासादरम्यान तिकीट हरवले असेल तर आपण घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.