पीएम कुसुम योजना : 90 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप मिळवण्यासाठी अर्ज करताय का? मग अर्ज करतांना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर….

Ajay Patil
Published:

Pm Kusum Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पीएम कुसुम योजनेअंतर्गत 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंपासाठी नव्याने अर्ज मागवण्यात आले आहेत. पीएम कुसुम योजना चे पोर्टल 17 मे 2023 पासून पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे.

म्हणून जर तुम्हीही पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंप मिळवण्यासाठी अर्ज करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरं पाहता पीएम कुसुम योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दाखवला आहे. आतापर्यंत राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत.

मात्र शेतकऱ्यांनी अर्ज करताना घाई करू नये आणि कोटा उपलब्ध झाल्यानंतरच अर्ज करावा असं आवाहन केलं जात आहे. खरतर महाऊर्जाकडून सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून जिल्हा निहाय कोटा वाढवून दिला जात आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध झाल्यानंतरच अर्ज करावा. जेणेकरून पोर्टलवर एकदाच गर्दी होणार नाही आणि संकेतस्थळ बंद पडणार नाही.

हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसनंतर महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या मार्गांवरही सुरु होणार Vande Bharat Train, वाचा….

पीएम कुसुम योजना

महाराष्ट्र राज्य शासनाकडून मे 2021 मध्ये पीएम कुसुम योजनेसाठी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यानुसार, दरवर्षी एक लाख सौर कृषी पंप या पद्धतीने पाच वर्षासाठी पाच लाख सौर कृषी पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम कुसुम योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर तसेच अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत.

म्हणजेच शेतकऱ्यांना केवळ पाच ते दहा टक्के रक्कम सौर कृषी पंपासाठी भरावी लागते आणि उर्वरित रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळत असते. निश्चितच ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे.

हे पण वाचा :- खुशखबर ! अंगणवाडी सेविकांना ‘या’ महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव मानधनाचा लाभ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

अर्ज करताना ही काळजी घ्या?

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करायचा आहे. बनावट संकेतस्थळावर अर्ज करू नये अन्यथा शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते असे आवाहन महाऊर्जांकडून करण्यात आले आहे. https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी बांधव पीएम कुसुम योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करताना जर शेतकऱ्यांना काही अडचण येत असेल तर ०२०-३५०००४५६ /०२०-३५०००४५७ या नंबर वर शेतकरी बांधव संपर्क साधू शकणार आहेत.

हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! या बँकेत निघाली मोठी भरती, आजच ‘या’ इमेलवर पाठवा आपला अर्ज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe