Shani Vakri : शनीची उलटी चाल शुभ मानली जात नाही. त्यामुळे असे मानले जाते की, ज्यावेळी शनि प्रतिगामी होतो त्यावेळी त्याचा अशुभ प्रभाव खूप जास्त असतो. खरं तर वक्री शनि अधिक हट्टी आणि प्रबळ बनत जाते. त्यामुळे याचा वाईट परिणाम काही राशींना सहन करावा लागतो.
तर काही राशींना त्याचा खूप फायदा होतो. त्यांना लाभाची आणि तसेच प्रगतीची संधी मिळते. दरम्यान हे लक्षात घ्या की 17 जून रोजी शनिदेव स्वराशी कुंभमध्ये प्रतिगामी होणार आहेत. त्यामुळे शनिदेव काही दिवस उलटे फिरणार आहेत.
काही राशींना शनि वक्रीमुळे फायदा होणार आहे, तर काही राशींना यामुळे तोटा सहन करावे लागणार आहे. दरम्यान अशा 4 राशी आहेत, ज्यांना सावध राहावे लागणार आहे.
1. मेष रास
यावेळी गुरू, बुध आणि राहू मेष राशीत आहे. तसेच कुंभ राशीत शनीची प्रतिगामी असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात तुम्हाला मेहनतीनुसार फळ मिळाले नाही तर तुमची निराशा होऊ शकते. तसेच तुमचा शारीरिक आणि मानसिक ताण वाढू शकतो.
2. कर्क रास
कर्क रास असणाऱ्या लोकांनी शनीच्या प्रतिगामी काळात खूप सावध राहणे गरजेचे आहे. कारण यावेळी कर्क राशीवर शनिध्याचा प्रभाव असून खासकरून नोकरदारांनी सावध राहवे. तसेच त्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
3. तूळ रास
शनीच्या प्रतिगामी स्थितीमुळे तूळ रास असणाऱ्या लोकांनी खूप सावध राहवे लागणार आहे. तसेच, गोंधळामुळे या काळात परस्पर मतभेदात वाढ होऊ शकते. त्यामुळे या लोकांना कार्यक्षेत्रात वादविवादापासून दूर राहावे लागणार आहे. इतकेच नाही तर त्यांना आर्थिक क्षेत्रात सुरक्षित राहावे लागणार असून त्यासोबत त्यांना त्यांच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
4. कुंभ रास
शनि कुंभ राशीत बसला असून या राशीवर शनीच्या प्रतिगामीपणाचा अशुभ प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या काळात या राशीच्या लोकांना मानसिक तणाव जाणवू शकतो. तसेच त्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा. एवढेच नाही तर व्यापार क्षेत्राशी निगडित लोकांना फायदा होईल, परंतु वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो.