Recharge Plan Offer : अप्रतिम प्लॅन.. अवघ्या 5 रुपयात मिळवा वर्षभरासाठी 600GB डेटासह अनेक फायदे, कसे ते पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Recharge Plan Offer : सध्याच्या काळात इंटरनेटचा जास्त वापर केला जात आहे. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन अनेक कंपन्या आपले पोस्टपेड रिचार्ज प्लॅन आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. सर्व कंपन्यांच्या फायद्यांमध्ये आणि किमतीत कमालीचा फरक असतो.

त्यामुळे सतत या कंपन्यांमध्ये टक्कर पाहायला मिळते. असाच एक रिचार्ज प्लॅन बीएसएनएल आणि वोडाफोन- आयडियाने आणला आहे. ज्याची किंमत अनुक्रमे 5 रुपये आणि 8 रुपये आहेत. जाणून घेऊयात यातील फायदे.

BSNL चा 1999 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये खूप फायदे दिले जात आहेत. कंपनीच्या 1999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल ऑफर केले जात आहेत. या प्लॅनमध्ये, संपूर्ण वैधता कालावधीसाठी 600GB मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध असून दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. किमतीचा विचार आणि वैधतेनुसार पाहिले तर, या प्लॅनमध्ये दररोजचा खर्च एकूण 5 रुपये येतो.

तसेच या प्लॅनमध्ये उपलब्ध असणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये मोफत PRBT (पर्सनलाइझ्ड रिंग बॅक टोन), 30 दिवसांसाठी अनलिमिटेड गाणे बदलण्याचा पर्याय, 30 दिवसांसाठी लोकधुन सामग्रीमध्ये प्रवेश तसेच 30 दिवसांसाठी EROS Now मनोरंजन सेवा यांचा समावेश करण्यात आला आहे.

वोडाफोन- आयडियाचा 1999 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन- आयडियाचा 1999 रुपयांचा प्लॅन 250 दिवसांच्या वैधतेसह 1.5GB दैनिक डेटा ऑफर करत आहे. म्हणजेच, संपूर्ण वैधता दरम्यान, ग्राहकांना 375GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस शिवाय, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली जात आहे. किंमत आणि वैधतेनुसार पाहिले तर प्लॅनमधील रोजचा खर्च सुमारे 8 रुपये आहे.

लक्षात घ्या फरक

BSNL आणि Vodafone Idea दोन्ही त्यांच्या ग्राहकांना 1999 रुपयांचे प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहेत, त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये आणि फायद्यांमध्ये खूप फरक असून BSNL च्या प्लॅनमध्ये 600GB एक-वेळ डेटा येतो, जो Vodafone Idea च्या प्लानमधील डेटापेक्षा अधिक आहे. ज्या ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठी जास्त डेटा लागतो त्यांच्यासाठी बीएसएनएलचा प्लॅन फायद्याचा आहे.

तर बीएसएनएलचा प्लॅन युजर्सना जास्त वैधता देतो. हे लक्षात घ्या की BSNL प्लॅनमध्ये मोफत PRBT, अनलिमिटेड गाणे बदलण्याचा पर्याय आणि लोकधुन तसेच EROS NOW सारख्या लोकप्रिय मनोरंजन सेवांमध्ये प्रवेश यासारखे अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे.