Amazon Sale : 5000mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसर असणारे रियलमीचे ‘हे’ फोन स्वस्तात खरेदी करता येणार, पहा ऑफर

Ahmednagarlive24 office
Updated:
Amazon Sale

Amazon Sale : काही दिवसांपूर्वी रियलमीने Realme Narzo N53 आणि Realme Narzo N55 हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. तुम्ही आता हे फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची यावर हजारो रुपयांची बचत होऊ शकते.

अशी भन्नाट सवलत तुमच्यासाठी Amazon वर मिळत आहे. उद्यापासून ही सेल सुरु होणार आहे. जी 15 जून पर्यंत चालणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्यावा लागणार आहे. दरम्यान काय आहे ही सेल? जाणून घेऊयात

या ठिकाणाहून तुम्ही Realme Narzo N53 आणि Realme Narzo N55 खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. कंपनीने नुकताच Realme Narzo N53 लॉन्च केला आहे. तर Narzo N55 एप्रिलमध्ये लॉन्च करण्यात आला होता.

जाणून घेऊयात Realme Narzo N55 आणि Narzo N53 ची किंमत

किमतीचा विचार केला तर Narzo N55 स्मार्टफोन हा 10,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध असणार आहे. तुम्ही Narzo N53 रु.8,699 रुपयात खरेदी करू शकता. या दोन्ही स्मार्टफोनची ऑफर किंमत कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Realme.com या दोन्हीवर उपलब्ध असून यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे, ही सेल 15 जूनपर्यंत चालणार आहे.

किंमत आणि स्टोरेजचा विचार केला तर Realme Narzo N55 चा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपयांना खरेदी करता येईल. यावर 500 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. तर त्याच्या 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये इतकी असून जो 750 रुपयांच्या सवलतीत सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच Narzo N53 ची किंमत 8,999 रुपये इतकी असून जो तुम्ही 300 रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता.

फीचर्स

कंपनीच्या Narzo N55 मध्ये 6.72-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला असून स्क्रीन 90Hz रिफ्रेश दर आणि 680Nits च्या पीक ब्राइटनेससह येते. कंपनीचा हा फोन Helio G88 प्रोसेसरवर काम करेल. यात 4GB RAM / 6GB RAM आणि 64GB / 128GB स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच 64MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा मिळत आहे.

तसेच फोनच्या फ्रंटमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असून हा फोन 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

Realme Narzo N53 मध्ये 6.74-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळेल. हा फोन Unisoc T612 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा तसेच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. कंपनीकडून यामध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग पर्याय दिला आहे. जो Android 13 वर काम करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe