DA Hike : कर्मचाऱ्यांनो.. कधीही वाढू शकतो महागाई भत्ता, पगारात होणार ‘इतकी’ वाढ

DA Hike

DA Hike : केंद्र सरकारकडून नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीत महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या या मोठ्या घोषणेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 झाला होता.

अशातच आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. इतकेच नाही तर महागाई भत्त्यासोबत फिटमेंट फॅक्टरही वाढू शकतो. जर सरकारने असा निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

महागाईवर आधारित वाढतो महागाई भत्ता

जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला तर तो 46 टक्क्यांवर जाऊ शकतो. साहजिकच त्यामुळे त्यांच्या पगारात वाढ होणार आहे. दरम्यान केंद्र सरकार महागाईचा दर पाहता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवत असते. त्यामुळे महागाई जितकी जास्त तितका महागाई भत्ता जास्त. याबाबत कामगार ब्युरो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता तसेच महागाई सवलतीची गणना करत असते. त्याची गणना ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे करण्यात येते.

किती वाढणार पगार ?

महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. समजा केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये इतके आहे. जर आपण 38 टक्के पाहिले तर महागाई भत्ता 6,840 रुपये होतो. तर दुसरीकडे, 42 टक्के पाहिल्यास ते 7,560 रुपये होईल. एकंदरीत कर्मचाऱ्यांच्या पगारात 720 रुपयांची वाढ होईल.

केंद्र सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर पोहोचला असून यानंतर दोनदा महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भाग असून महागाईचा दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवत असते.

फिटमेंट फॅक्टरवर वाढणार?

केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवेल असे सांगण्यात येत आहे. समजा फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ जाहीर झाली तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर मिळत असून 4200 रुपये ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15,500 रुपये मूळ वेतन मिळत आहे. त्यामुळे त्यांचा एकूण पगार रु.15,500X2.57 किंवा रु.39,835 होऊ शकतो.

कर्मचाऱ्यांकडून सहाव्या CPC ने फिटमेंट फॅक्टरमध्ये 1.86 टक्क्यांनी वाढ करण्याची शिफारस करण्यात आली होती. फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवावा, अशी त्यांची मागणी आहे. समजा असे झाले तर सध्याचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये करण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe