Buy Online Olive seeds : भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. भारतात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र शेतकरी पारंपरिक शेती करत असल्याने त्यांना त्यामधून जास्त फायदा देखील होत नाही. तसेच खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांना काही वेळा तोटा देखील सहन करावा लागतो.
मात्र देशातील अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळले आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक नफा मिळत आहे. जर तुम्हाला शेतीमधून अधिक नफा मिळवायचा असेल तर तुम्ही ऑलिव्हची शेती करू शकतात.
भारतात ऑलिव्हची लागवड आता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पीक लागवडीमधून शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील मिळत आहे. पिकाचे उत्पन्न अधिक असल्याने नफा देखील अधिक होत आहे.
ऑलिव्हच्या बियांवर प्रक्रिया करून त्याचे तेल तयार केले जाते. तसेच या तेलापासून अनेक उत्पादने देखील तयार केली जातात. यामुळे ऑलिव्हच्या तेलाला जगभरातून मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
ऑलिव्ह ऑइलचा वापर स्वयंपाक, सौंदर्य उत्पादने आणि औषधे बनवण्यासाठी केला जातो. या तेलामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असल्याने त्याचे अनेक फायदे देखील आहेत. सध्या जगभरातून ऑलिव्ह ऑइलला खूप मागणी आहे.
ऑलिव्ह ऑइलचा आजार बरे करण्यात देखील मोठा वाटा आहे. ऑलिव्ह ऑइलचा कारण उपयोग पोटाशी संबंधित आजार आणि कर्करोगासाठी फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फिनॉल मोठ्या प्रमाणात आढळते.
येथून मागवा ऑलिव्ह बिया
जर तुम्हाला ऑलिव्हची शेती करायची असेल तर तुम्ही घरबसल्या याच्या बिया मागवू शकता. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळ ऑलिव्ह बियाणांची ऑनलाइन विक्री करत आहे. ओएनजीसीच्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करता येणार्या कोरॅटिना जातीला सर्वाधिक मागणी आहे.
जर शेतकऱ्यांना ऑलिव्हची शेती करण्यासाठी त्याच्या बिया लागत असतील तर शेतकरी घरबसल्या अर्ज करून त्याच्या बिया मागवू शकतात. खालील बिया मागविण्यासाठी लिंक देण्यात आली आहे त्याद्वारे तुम्ही सहज बिया मागवू शकता.
Best quality Olive Saplings of different Varieties (Koroneiki, Barnea, Coratina & Arbequina) from NSC is available online @ONDC_Official
To order online click on https://t.co/dpEkri41tf now. #NationalSeedsCorpLtd #FarmSona @nstomar @AgriGoI @KailashBaytu pic.twitter.com/GTZXdxUasH
— National Seeds Corp. (@NSCLIMITED) June 22, 2023
ऑलिव्हच्या चार प्रगत जाती
कोराटीना
जर तुम्हाला ऑलिव्हची शेती करायची असेल तर कोराटीना या प्रगत जातीची लागवड तुम्ही करू शकता. सध्या या जातीच्या बियाणांना बाजारात प्रचंड मागणी आहे. या जातीच्या प्रत्येक रोपापासून शेतकरी 10-15 किलो उत्पादन मिळवू शकतात. त्यात तेलाचे प्रमाण 22-24 टक्के आहे.
कोरोनिकी
कोरोनिकी ऑलिव्हची ही जात देखील शेती करण्यासाठी सर्वोत्तम आहे. या प्रगत वाणापासुन देखील शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळू शकते. एका झाडापासून सुमारे 20 ते 25 किलो उत्पादन मिळू शकते.
बरानिया
बरानिया या जातीच्या ऑलिव्ह बियांपासून २६ टक्के तेल निघण्याची क्षमता आहे. याचे एक झाड जवळपास 15-20 किलो उत्पादन देते. त्यामुळे या जातीची लागवड करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.
अर्बेक्विना
अर्बेक्विना या ऑलिव्हचे फळ आकाराने मोठे असते. त्यामुळे या जातीच्या ऑलिव्हची लागवड करून चांगला नफा मिळवू शकता. प्रति रोप 7 ते 10 किलो उत्पादन देते. याच्या फळामध्ये 10 ते 17 टक्के तेल असते.