Cotton Crop : कापूस पेरणी करताना वापरा ही नवीन सोपी पद्धत, होतील अनेक फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Crop : सध्या देशामध्ये सर्वत्र मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची शेतीकामासाठी लगबग सुरु झाली आहे. पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर आता शेतकऱ्यांकडून पेरणीची कामे केली जातील. तसेच या हंगामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

आता कापूस पेरणीची आणखी एक नवीन पद्धत समोर आली आहे. कापूस पेरणीची नवीन पद्धत पंजाब राज्यामध्ये विकसित करण्यात आली आहे. या नवीन पद्धतीने कापूस पेरणी या पंजाबमध्ये करण्यात आली आहे.

पंजाबमधील कापूस पेरणी जरी संपली असली तरी आता इतर राज्यांमध्ये कापूस पेरणी अजूनही त्यामुळे इतर राज्यामधील शेतकऱ्यांना कापूस पेरणीची ही नवीन पद्धत खूप फायदेशीर ठरणार आहे.

बेड प्लांटेशन ही कापसाची नवीन पेरणीची पद्धत विकसित करण्यात आली आहे. बेड प्लांटेशन पद्धतीने कापसाची लागवड करण्याचे अनेक फायदे आहेत. जर अशा पद्धतीने कापसाची लागवड केली तर पाण्याची बचत होईल. तसेच पेरणी केलेले बियाणे पूर्णपणे उगवेल आणि टॅन देखील जास्त उगवणार नाही.

पंजाब राज्यामधील अनेक शेतकरी कापूस लागवडीच्या या विकसित पद्धतीकडे वळले आहेत. कापसाची नवीन पद्धत पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. आता मजुरांची संख्या कमी असल्याने अनके कामे यंत्राच्या साहाय्याने केली जातात.

ट्रॅक्टरच्या साहाय्याने कापसाची लागवड केली जाऊ शकते. ट्रॅक्टरच्या साहायाने बेड काढले जातात आणि तसेच बिया देखील पेरल्या जातात. त्यामुळे मजुरांची संख्या देखील कमी प्रमाणात लागते त्यामुळे वेळेची बचत तर होतेच मात्र पैशांची देखील बचत होते.

बेडवर कापसाची लागवड केल्या त्याला सिंचनाद्वारे पाणी दिले जाऊ शकते. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि पूर्ण शेतात पाणी देण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने शेतीमध्ये तण देखील कमी प्रमाणात उगवते.

कापूस बेड लागवडीचा फायदा

कृषी संचालक गुरविंदर सिंग TOI संगणतात की, कापसाची बेड पद्धतीने लागवड ही अतिशय प्रभावी पद्धत आहे. कापसाच्या या लागवड पद्धतीमध्ये अनके प्रगतशील शेतकऱ्यांनी रस दाखवला आहे. या हंगामात पंजामधील अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने कापसाची लागवड केली आहे.

वनस्पती संरक्षण अधिकारी डॉ. जसविंदर सिंग म्हणतात, राज्यातील शेतकऱ्यांना भातशेती सोडून कपाशीच्या शेतीकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे पाण्याची बचत होईल.

यावेळी शेतकऱ्यांना बेड लागवडीबाबत सांगितले असता, त्याचे फायदे जाणून घेत त्यांनी प्रयत्न सुरू केले. बेड प्लांटेशन तंत्रज्ञानाने कापसाची लागवड केल्यास फुले सहज तोडता येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बंपर परतावा मिळेल.

कापसाचे क्षेत्र वाढले नाही

पंजामध्ये कापसाचे क्षेत्र अजूनही वाढलेले नाही. सरकारकडून कापसाच्या बियाणांवर अनुदान दिले जात असले तरी कापसाखालील क्षेत्रात वाढ होत नसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कापूस लागवडीचे क्षेत्र फारच कमी आहे.

पंजामध्ये देखील भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र भातशेतीसाठी जास्त पाणी लागत असल्याने शेतकऱ्यांना कपाशीच्या शेतीकडे वळवले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना कपाशीच्या शेतीकडे वळवण्यात फारसे यश आले नसल्याचे दिसून येत आहे.