Maharashtra News : हिंदू विवाह गाण्याचा, खाण्या-पिण्याचा ‘इव्हेंट’ नाही की व्यापारी पद्धतीचा व्यवहार नाही. तो एक संस्कार आहे, अशी टिप्पणी करतानाच ज्या विवाहात सप्तपदीसारखे आवश्यक विधी केले जात नाहीत,
त्यास हिंदू विवाह कायद्यानुसार ग्राह्य धरता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
कोणतेही पारंपरिक विधी न करता लग्न केलेल्या दोन वैमानिकांच्या घटस्फोटप्रकरणी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. बी. व्ही. नागररत्ना आणि न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने सांगितले की, विवाह संस्था ही एक पवित्र संस्था आहे.
तरुण आणि तरुणींनी विवाह करण्यापूर्वी त्याबद्दल सखोल विचारसोहळा म्हणजे काही नाच- केला पाहिजे. विवाह हा केवळ नाच-गाण्याचा, खाण्या-पिण्याचा आणि हुंडा वा भेटवस्तू मागण्याचा सोहळा नाही.
कधी कधी असा हुंडा वा भेटवस्तू देण्याची सक्ती केली जाते. विवाह हा व्यवहार नाही. कुटुंब ही भारतीय समाजातील एक पायाभूत संस्था आहे. भविष्यात असे कुटुंब निर्माण होते ते विवाहातून, अशा शब्दांत खंडपीठाने विवाह संस्थेचे महत्त्व विशद केले.
आपल्यासमोरील वैमानिकांच्या विवाहाचे उदाहरण देऊन खंडपीठ म्हणाले की, हल्ली हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींनुसार योग्य ते विधी न करताच तरुण-तरुणी एकमेकांशी लग्न करून पती-पत्नी बनत आहेत. ही बाब आपणास नामंजूर आहे.
हिंदू विवाह कायद्याने बहुपत्नीत्व, बहुपतीत्व आणि अशा प्रकारचे सर्व संबंध हे स्पष्टपणे धिक्कारले आहेत. संसदेलाही असेच वाटते की, देशात भिन्न विधी आणि परंपरा असलेला विवाहाचा एकच प्रकार असावा, असेही न्यायालयाने म्हटले.
दरम्यान, न्यायालयाने या वैमानिकांचा घटस्फोटाचा खटला, तसेच पती आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला हुंड्याचा गुन्हाही रद्द केला.
ज्यात सप्तपदीसारखे आवश्यक ते विधी आणि सोहळे केले जात नाहीत, ते लग्न हिंदू विवाह म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. हिंदू विवाह हा एक संस्कार आहे. त्यास एक पावित्र्य आहे. ऋग्वेदानुसार सप्तपदी संपल्यानंतर नवरदेव नवरीला म्हणतो की, ही सात पावले चालल्यानंतर आता आपण मित्र (सखा) बनलोआहोत.
माझे तुझ्याशी मैत्र जुळो, मी कधीही या मैत्रीपासून दूर जाऊ नये. पत्नीला अर्धांगिनी म्हटलेले असले, तरी तिचे स्वतःचे अस्तित्व स्वीकारून आणि तिला बरोबरची भागीदार असे या विवाहात मानले जाते. विवाहाचा हा संस्कार हाच नव्या कुटुंबाचा पाया असतो.– सर्वोच्च न्यायालय