उन्हाळ्यात ‘या’ टिप्स वापरा आणि कारमध्ये मिळवा एसीपासून उत्तम कुलिंग आणि चांगले मायलेज! वाचेल पैसा

Ajay Patil
Published:
car ac cooling tips

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे प्रत्येक जण कारने प्रवास करताना कारमधील एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. आपण कुठे उन्हाळ्यात प्रवासाला निघालो तर कारमध्ये बसता क्षणी कार मधील एसी ऑन करतो. परंतु आपल्याला माहित आहे की कारमधील एसी जेव्हा सुरू असतो तेव्हा त्याचा थेट परिणाम हा कारच्या मायलेज वर होत असतो.

त्यामुळे एसी योग्य तापमानामध्ये सेट करणे खूप महत्त्वाचे असते. जेणेकरून कारच्या आतमध्ये कुलिंग देखील चांगले राहते व कारच्या मायलेजवर देखील विपरीत परिणाम होत नाही. परंतु या उलट जर तुम्ही जास्त तापमानामध्ये एसी वापरला तर कुलिंग देखील चांगले मिळत नाही आणि तापमान खूप थंड असेल तर मायलेज देखील कमी होते.

त्यामुळे तुम्हाला कारमध्ये एसीचे योग्य टेंपरेचर किती ठेवावे हे माहीत असणे गरजेचे आहे. तुम्हाला उन्हाळ्यात कारमध्ये एसी चालवायचा आहे आणि मायलेज देखील चांगले ठेवायचे आहे तर या लेखात काही टिप्स दिलेले आहेत त्या तुम्ही वापरणे गरजेचे आहे.

 उन्हाळ्यात या टिप्स वापरा आणि एसीपासून कारच्या आतील कुलिंग चांगले ठेवा मायलेज देखील टिकवा

1- गाडी उन्हात पार्क करणे टाळा आपल्याला माहित आहे की उन्हाच्या कालावधीत जर वाहन सावलीत न उभे करता उन्हात उभे केले तर ते अक्षरशः प्रचंड प्रमाणात तापते.

त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये  एसीला कार थंड करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मेहनत घ्यावी लागते व एसी बराच काळ चालू ठेवल्यानंतर ही थंड होण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे ही समस्या टाळायची असेल तर कार सावलीच्या ठिकाणी पार्क करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

2- एसी ताबडतोब चालू करू नये बऱ्याचदा आपल्याला सवय असते की आपण कारमध्ये बसल्यानंतर लगेच एसी चालू करतो. परंतु तसे न करता अगोदर तुमच्या कारच्या खिडक्या काही काळ उघडा ठेवाव्या. असे केल्यामुळे आतली गरम हवा बाहेर जाईल. त्यानंतर काही चालू करावा म्हणजेच ते वातावरण एसीमुळे पटकन थंड होते व जास्त ऊर्जा वाचते.

3- एसीचा मोड योग्य ठेवणे कारचे एसीमध्ये ऑटोमॅटिक आणि फॅन असे मोड असतात. त्यामुळे तुमची गरज कशी आहे त्या पद्धतीने तुम्ही एसीचा मोड सेट करणे गरजेचे आहे. ऑटोमॅटिक मोड ताबडतोब कूलिंग देण्यासाठी मदत करतो. परंतु त्याकरिता अधिक ऊर्जा खर्च होते व त्यामुळे मायलेज कमी होतो. त्यामुळे फॅनचा वेग आणि तापमान तुमच्या गरजेनुसार सेट केलेले फायद्याचे ठरते.

4- योग्य तापमान सेट करणे कारच्या एसीचे योग्य तापमान सेट करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे कारचे मायलेज वाढण्यास मदत होते. जर कार मध्ये मॅन्युअल एसी असेल तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तापमान सेट करू शकतात. साधारणपणे कार एसी 22 ते 25 अंश सेल्सिअस वर सेट करणे चांगले असते. त्यामुळे एसीच्या कॉम्प्रेसर वर कोणताही ताण येत नाही आणि मायलेज देखील चांगले राहते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe