पुण्यात फ्लॅट घ्यायचा प्लान आहे का? असाल स्वस्त फ्लॅटच्या शोधात तर ‘या’ भागात मिळेल तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये फ्लॅट

Published on -

 पुणे आणि मुंबई हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर असून औद्योगिक आणि इतर सर्व प्रकारच्या बाबतीत ही शहरे विकसित असून अजून देखील झपाट्याने या शहरांचा विकास होतच आहे. महाराष्ट्रातून बरेच व्यक्ती रोजगाराच्या निमित्ताने पुणे किंवा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. तसेच नवीन नोकरी शोधणारे तरुण-तरुणी  देखील पुणे आणि मुंबईचा जास्त करून विचार करतात.

तसेच बऱ्याच दिवसांपासून ज्या व्यक्ती पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये आहेत  असे व्यक्ती आणि ज्यांना भविष्यकालीन चांगला परताव्यासाठी गुंतवणूक करायची इच्छा आहे असे व्यक्ती पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये सदनिका विकत घेण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे भविष्यकाळामध्ये विकास होणारा भाग आणि स्वस्तात मिळणारे फ्लॅट याच्या शोधात बरेच जण असतात. यामध्ये कुणाला जर पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वस्तात फ्लॅट हवा असेल तर या लेखामध्ये आपण पुण्यातील कोणत्या भागामध्ये स्वस्तात फ्लॅट मिळणे शक्य आहे जो तुमच्या बजेटमध्ये असू शकतो, अशा पुण्याच्या जवळील काही भागांची माहिती घेणार आहोत.

 पुण्यातील या भागात मिळेल तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये फ्लॅट

1- शिरगावहे गाव तळेगाव दाभाडे या ठिकाणाहून अगदी जवळ असून पवना नदीच्या काठावर वसलेले आहे. जर आपण पुणे शहराचा विचार केला तर या ठिकाणी फ्लॅट्सच्या किमती गगनाला पोहोचलेल्या असताना मात्र पुण्याच्या अगदी जवळ आणि भविष्यामध्ये विकसित होऊ शकेल अशा शिरगाव या ठिकाणी कमीत कमी किमतीतील गृहप्रकल्पांचे कामे सुरू आहेत.

जर आपण या परिसराचा विचार केला तर येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षात हा भाग औद्योगिक दृष्टिकोनातून खूप प्रगत होईल अशी शक्यता असून त्या दृष्टिकोनातून या ठिकाणाचे रियल इस्टेट अर्थात प्लॉट किंवा फ्लॅट यांच्या किमती देखील वाढतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी गुंतवणुकीच्या दृष्टीने फ्लॅट घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. जर आपण या ठिकाणच्या फ्लॅटच्या किमती पाहिल्या तर वन बीएचके फ्लॅट ची किंमत साधारणपणे 27 लाख तर टू बीएचके फ्लॅट ची किंमत साधारणपणे 34 ते 27 लाखाच्या घरात आहे.

2- कोंढवा बुद्रुक पुण्यातील महत्त्वाचे हडपसर तसेच पुणे कॅम्प व कात्रज या ठिकाणची कनेक्टिव्हिटी उत्तम असलेला कोंडवा बुद्रुक हा पुण्याचाच एक भाग समजला जातो. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुणे शहराचा विस्तार या भागापर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. त्यामुळे भविष्यकालीन फायदा करिता जर तुम्हाला प्रॉपर्टी विकत घ्यायचे असेल तर तो तुमच्यासाठी फायद्याचा सौदा होऊ शकतो. मात्र सध्या हा भाग पुण्याच्या बाहेर असल्यामुळे या ठिकाणी असलेल्या फ्लॅटच्या किमती  कमी आहेत. साधारणपणे कोंडवा बुद्रुक येथे वन बीएचके फ्लॅट ची किंमत 32 ते 37 लाख आणि टू बीएचके फ्लॅट ची किंमत 43 ते 55 लाखाच्या घरात आहे.

3- येवलेवाडी मुख्य शहरापासून हा भाग बराच लांब असला तरी हा एक शांत असा परिसर असून ज्यांना शांततेत राहायला आवडते अशा व्यक्तींसाठी येथे फ्लॅट घेणे सोयीचे ठरू शकते. पुण्यापासून हा भाग दूर असला तरी या ठिकाणी सुरू असलेले वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे येणाऱ्या काळात या ठिकाणचा विकास झाल्यावर या ठिकाणी प्रॉपर्टीच्या किमती देखील वाढतील. सध्या येवलेवाडी येथे वन बीएचके फ्लॅट ची किंमत 25 ते 29 लाख आणि टू बीएचके फ्लॅट ची किंमत 29 ते 43 लाख रुपयांच्या घरात आहे.

4- वाघोली हा भाग पुण्याला अगदी जवळ असून पुणे विमानतळ तसेच ईऑन आयटी पार्क वाघोली च्या अगदी जवळ आहे. तसेच पुणे स्टेशन देखील थोड्याच अंतरावर असल्यामुळे येणाऱ्या कालावधीत वाघोलीचा विकास मोठ्या प्रमाणावर होण्याची दाट शक्यता आहे. भविष्यकाळासाठी तुम्ही या ठिकाणी फ्लॅट सारख्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करून फायद्याचा सौदा करू शकतात. सध्या वाघोली येथे वन बीएचके फ्लॅटची किंमत 27 लाख ते टू बीएचके फ्लॅट ची किंमत 38 ते 41 लाख रुपयांच्या घरात आहे.

5- फुरसुंगी फुरसुंगी या परिसरामध्ये देखील अनेक गृहप्रकल्पांचे कामे सुरू असून फुरसुंगी हे पुणे सासवड रस्त्याला लागून आहे. फुरसुंगी या भागाचा गेल्या दहा वर्षात खूप वेगाने विकास झाला असून हडपसर या ठिकाणी जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक कंपन्या देखील आहेत. यामध्ये तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये चांगले फ्लॅट्स मिळणे शक्य आहे. फुरसुंगी येथे साधारणपणे वन बीएचके 27 लाखातर टू बीएचके चा फ्लॅट 39 लाखात मिळणे शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe