यासाठी टाकळीभान ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहेत. अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठा असून, त्याचे विभाजन होणे गरजेचे असून, नवीन जिल्ह्यासाठी श्रीरामपूर योग्य असून, दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अहमदनगरच्या खालील तालुक्यांच्या मध्यवर्ती श्रीरामपूर असून, सर्व सोयीसुविधा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून श्रीरामपूरमध्ये उपलब्ध आहेत.
जिल्ह्याच्या निर्मितीसाठी लागणारी मोठी शासकीय जागा, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, उपप्रादेशिक मागणी केली. परिवहन कार्यालय, जिल्हा विभागीय कार्यशाळा, रेल्वेव्यवस्था, जिल्हा सत्र न्यायालय, पाण्याची व्यवस्था अशा सर्व सुविधा उपलब्ध असून,
सर्व तालुक्यांच्या केंद्रस्थानी असलेला श्रीरामपूर तालुका आहे. येथील बाजारपेठेचाही राज्यात लौकिक आहे, त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा करावा, अशी मागणी पत्राद्वारे टाकळीभान पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे पत्र ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहेत.
याप्रसंगी ग्रामस्थ राजेंद्र कोकणे, प्रा जयकर मगर, दादासाहेब कापसे गजानन कोकणे, अर्जुन राऊत बाबासाहेब तनपुरे, बापूसाहेब शिंदे राजेंद्र देवळालकर, मधुकर गायकवाड रामनाथ माळोदे, विष्णुपंत पटारे आदी उपस्थित होते.