Panjabrao Dakh: पंजाबरावांच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यामागची ‘ही’ आहेत गुपिते, पंजाबरावांनी स्वतः दिली महत्त्वाची माहिती

Updated on -

Panjabrao Dakh:- भारतामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी स्पेशल खाते असून ते म्हणजे भारतीय हवामान विभाग होय. हवामानासंबंधीच्या महत्त्वाचा अंदाज या खात्याकडून वर्तवण्यात येतो. परंतु मागील तीन ते चार वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये हवामान अंदाजाबाबतीत अतिशय विश्वासाचे नाव असलेले पंजाबराव डख हे पावसाच्या अचूक अंदाजाविषयी खूप लोकप्रिय आहेत.

पंजाब रावांनी वर्तवलेले पावसाचे अंदाज बहुतांशी सत्य ठरलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अशा प्रकारचा विश्वास पंजाबरावांचा अंदाजावर असतो. परंतु हवामानाचा अचूक अंदाज पंजाबराव कोणत्या आधारावर वर्तवतात? हा देखील प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडत असेल. नेमक्या अशा कोणत्या बाबी आहेत की ज्या आधारे पंजाबराव चा अंदाज अचूक ठरतो. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर पंजाबरावांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे. याबद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत.

 पंजाबरावांनी सांगितली पावसाच्या अंदाज वर्तवण्यामागचे गुपिते

याबद्दलच्या सविस्तर वृत्त असे की, पावसाचा अंदाज बाबत शेतकऱ्यांमध्ये अतिशय विश्वासाचे नाव असलेले पंजाबराव  डख यांनी नुकतीच एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ते नेमके कोणत्या आधारावर पावसाचा अंदाज वर्तवतात? एखादी बद्दल महत्वाची माहिती दिली. याविषयी बोलताना पंजाबराव यांनी म्हटले की, निसर्गाचा अभ्यास व आपल्या अवतीभवतीचे नैसर्गिक स्थिती कोणत्या पद्धतीची आहे, यावरून ते पावसाचा अंदाज व्यक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी पुढे म्हटले की, जेव्हा ते पावसाचा अंदाज वर्तवतात त्यासाठी ते उपग्रह छायाचित्रे तसेच काही आजूबाजूच्या निरीक्षणाचा आधार घेत असतात. हवामान खात्याकडून जे काही उपग्रह फोटो येतात त्यांचा आधार घेऊन ते पावसाचा अंदाज व्यक्त करत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. हवामान खाते या कडून काही ठराविक वेळेमध्ये उपग्रह छायाचित्रे जारी केले जातात. परंतु यामध्ये साडेतीन वाजता जे उपग्रह छायाचित्र जारी केले जाते ते अधिक स्पष्ट व अचूक अंदाज विषयी महत्वाचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

याविषयी सुरुवातीला पंजाबरावांचा पावसाविषयीचा अंदाज चुकला होता व त्याविषयी त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, यावर्षी मान्सूनच्या आगमनावेळी चक्रीवादळाने तीव्र वेग धारण केल्यामुळे राज्यात पाऊस आला नाही व त्यांचा अंदाज चुकला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पूर्वेकडून जो काही पाऊस येतो तो महाराष्ट्राला खूप फायद्याचा असतो. पूर्वेकडून येणाऱ्या ढगांमुळे खूप प्रमाणात पाऊस पडतो. तसेच त्यांनी म्हटले की अरबी समुद्रात चक्रीवादळ आले की पूर्वेकडून पाऊस येतो असे निरीक्षण देखील त्यांनी सांगितले.

 निसर्गातील घटनांचा देखील घेतात आधार

पुढे बोलताना पंजाबराव यांनी सांगितले की, निसर्ग देखील शेतकऱ्याला पावसाविषयी काहीतरी माहिती सांगत असतो. निसर्गातील झाडे आणि कीटक देखील पावसाची माहिती देत असतात. समजा गावरान आंब्याला जर फुलोरा आला नाही तर त्यावेळी पाऊस येत नाही. हे लक्षात दुष्काळाच्या संकटाचा अंदाज असतो असे देखील त्यांनी म्हटले. ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास असेल अशा लोकांना जर अधिक त्रास जाणवू लागला तर यावरून पाऊस येणार असल्याचा अंदाज व्यक्त करता येतो असे देखील महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

या निरीक्षणाविषयी त्यांनी म्हटले की ही माझी काही अनेक वर्षापासून ची परंपरागत निरीक्षण आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये पावसात वाढ झाली असून पावसाची दिशा देखील बदलली आहे व तापमानामध्ये वाढ झाल्याचे देखील त्यांनी नमूद केले. तसेच मुंबईचा पाऊस हा आता गुजरातच्या दिशेने चालला आहे परंतु तो याआधी मराठवाड्याकडे यायचा आणि त्याचा फायदा होत असे असेदेखील त्यांनी म्हटले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News