Ahmednagar News : जामखेड शहराच्या हद्दीतील कला केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी बंद करून कलाकेंद्र बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की,
मराठवाड्यासह पाच जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेडचे नाव राज्यात मोठे आहे. रेमन मँगासेस पूरस्कार विजेते डॉ. रजनीकांत आरोळे यांच्या आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीमुळे जामखेडचे नाव संपूर्ण जगात आदराने घेतले जाते.
एकेकाळी कला केंद्र उपजिविकेची साधनं होती. मात्र सध्या कलेच्या नावाखाली सर्व नियमांची पायमल्ली होत आहे. या कलाकेंद्रामुळे शेजारच्या गावात कोणी मुली देत नाहीत. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत.
राज्यातील पर राज्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांचा वावर याठिकाणी आहे. तसेच नशेच्या अमलाखाली असलेल्या व्यक्ती स्थानिक नागरिकांशी देखील गोंधळ घालतात. परिणामी शहरासह आसपासच्या लोकांचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे.
त्यामुळे सामाजिक हिताच्या दृष्टीने सदर कलाकेंद्रांची पोलीस व जिल्हा प्रशासनाने चौकशी करून संबंधित कलाकेंद्राचे परवाने रद्द करावेत. अशा मागणीचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले आहे. १५ दिवसात याबाबत चौकशी करून कारवाई करावी अन्यथा जामखेड तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते दिगांबर आजबे यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या बाबत जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना सामाजिक कार्यकर्ते दिगांबर उत्तमराव आजबे पाटील, सचिन दत्तात्रय आजबे, सतिश वसंतराव राजगुरू, किशोर राजू कांबळे, चंद्रकांत दत्तात्रय राऊत, दत्तात्रय उत्तम आजबे, दत्तात्रय राजाराम साळुंखे, आशोक भागवत उगले,
सय्यद जाकिर इब्राहीम, महामुनी सुंदरलाल रामभाऊ, पांडुरंग रघुनाथ जाधव, सचिन उत्तम जाधव, राऊत राजेंद्र सावता, राऊत दशरथ तुकाराम, सुवर्णा दिगांबर आजबे, यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन दिले आहे.