Mhada Lottery 2023 : म्हाडा सोडतीतील १ लाख १९ हजार अर्जदारांकडून अनामत रकमेचा भरणा

Ahmednagarlive24 office
Updated:
Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून २२ मे रोजी जाहीर केलेल्या ४ हजार ८२ घरांच्या सोडतीला शेवटच्या दिवशी १ लाख ४५ हजार अर्जदारांनी नोंदणी केल्याचे दिसून आले आहे.

तर अर्जदारांच्या १ लाख ४५ हजार ८४९ अर्जांच्या एकूण नोंदणीपैकी १ लाख १९ हजार २७८ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे बुधवारी अंतिम आकडेवारी म्हाडाकडून जाहीर करण्यात येणार आहे. सोडतीतील अर्जदारांच्या आकडेवारीनुसार, उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी केवळ २९२८ अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबई मंडळातर्फे अर्ज भरणा करण्याची मुदत ११ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता संपुष्टात आली आहे;

परंतु अर्जदार अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा रात्री ११.५९ वाजेपर्यंत करू शकणार आहेत. तसेच एनईएफटी / आरटीजीएस द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदार १२ जुलै २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करू शकतील.

१७ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. १९ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत.

२४ जुलै २०२३ रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ सदनिकांकरता ३५, २३१ अर्ज अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांकरता ७३, ४१४ अर्ज मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांकरता १०,५०० अर्ज उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २९२८ अर्ज प्रधानमंत्री आवास योजना १९४७ सदनिकांसाठी २३,७७६ अर्ज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe