Loan Scheme 2023: सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळवा बिनव्याजी 1 लाख रुपये कर्ज अन सुरू करा व्यवसाय, वाचा योजनेची संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:
loan

Loan Scheme 2023:-  बेरोजगारी एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्थेपुढील एक ज्वलंत समस्या आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने महाविद्यालयांमधून पदवी घेऊन बाहेर पडणारे तरुण आणि तरुणी यांच्या संख्येच्या तुलनेत मात्र नोकऱ्यांची उपलब्धता अगदी नगण्य आहे. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर  तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागतात एखाद्या व्यवसायात स्थिरस्थावर होने खूप गरजेचे आहे. व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे सगळ्यात आगोदर प्रश्न उभा राहतो तो लागणाऱ्या भांडवलाचा.

परंतु भांडवलाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अनेक छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनामार्फत योजना राबवण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून अनुदान आणि बिनव्याजी कर्ज अशा स्वरूपाची मदत करण्यात येते. याच पद्धतीने शासनाची एक महत्त्वाची योजना म्हणजे वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना होय. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना बिनव्याजी एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. त्यामुळे या लेखात आपण महत्वपूर्ण असलेल्या या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे स्वरूप

राज्यातील विविध महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय करता यावा याकरिता कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अगदी त्याच पद्धतीने वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय करता यावा याकरिता एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात येते. ही योजना प्रामुख्याने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे  या योजनेचा लाभ घेण्यासाठी चूक असलेल्या व पात्र व्यक्तींकरिता 30 पेक्षा अधिक नवीन व्यवसायांसाठी एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून समाजातील भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जे काही नागरिक आहेत त्यांचे आर्थिक उन्नती व्हावी व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करता यावे हा महत्त्वाचा उद्देश आहे.

समाजामध्ये छोट्या व्यवसायांना आर्थिक मदत देऊन त्यांना चालना दिली तर  नागरिकांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यात मदत करण्यास या योजनेचा खूप फायदा होताना दिसून येत आहे. तसेच या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत विशेष मागास प्रवर्गातील, भटक्या जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील अपंग, निराधार व विधवा महिलांना प्राधान्यक्रमाने तात्काळ कर्ज देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

 या योजनेअंतर्गत मिळणारे कर्जाचे स्वरूप परतफेडीची मुदत

योजनेच्या माध्यमातून संबंधित प्रकल्पामध्ये मंडळाचा 100% सहभाग असतो व यासाठी एक लाख रुपयांची रक्कम देण्यात येते. जे कर्जदार नियमित कर्ज परतफेड करतील अशा लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही. परंतु जर कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही तर लाभार्थ्याला दंडनीय स्वरूपाचा व्याजदर आकारण्यात येतो.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, जातीचा दाखला, संबंधित व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि मागणी केल्यास इतर कागदपत्रे लागतात.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा कराल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रामुख्याने वसंतराव नाईक महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर नोंदणी या पर्यायावर क्लिक करून तुमची नवीन नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करून तुम्हाला या योजनेची संबंधित असलेल्या अर्ज सविस्तर व काळजीपूर्वक भरायचा आहे.

अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे व इतर माहितीसाठी आपण पात्र आहोत का? याची पडताळणी करणे गरजेचे असून त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरावा. स्वतः अर्ज भरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जवळचे आपले सरकार किंवा सीएससी सेंटर मध्ये जण अर्ज भरू शकतात.

 कोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज?

मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, पावर टिलर, सायबर कॅफे, झेरॉक्स मशीन, ब्युटी पार्लर, पापड उद्योग, वडापाव विक्री, डीटीपी वर्क, ड्राय क्लीनिंग, गॅरेज, रेफ्रिजरेटर दुरुस्ती, मटन आणि चिकन शॉप, आईस्क्रीम पार्लर, मासळी विक्री, किराणा दुकान, टेलिफोन बूथ, मोबाईल रिपेरिंग, इलेक्ट्रिक शॉप, भाजीपाला विक्री, फळ विक्री, हॉटेल, स्वीट मार्ट, भाजीपाला विक्री, मिरची कांडप, मसाला उद्योग, हेअर सलून, संगणक, हार्डवेअर पेंट शॉप इत्यादी व्यवसायांसाठी या महामंडळ योजना अंतर्गत कर्ज सुविधा मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe